IND vs WI : तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा बदल, विराट नाही तर रोहित कर्णधार?

India vs West Indies : विराट कोहलीला विश्रांतीची गरज असल्यामुळं आजच्या सामन्यात पंचासोबत मैदानाचे परिक्षण करताना रोहित शर्मा हजर होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 08:38 PM IST

IND vs WI : तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा बदल, विराट नाही तर रोहित कर्णधार?

गयाना, 06 ऑगस्ट : गयानामध्ये भारच-वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याला पावसामुळं विलंब होत आहे. त्यामुळं अद्याप टॉस झालेला नाही. दरम्यान या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा आज कर्णधारपदी विराजमान आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी भारतानं घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवत त्यांना क्लिन स्विप देण्याच्या विचारात भारतीय संघ आहे. भारतानं 8 वर्षांनी विंडीजविरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे. पहिल्यास सामन्यात भारताला विजयासाठी झगडावं लागलं. तर दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा वर्ल्ड कपमधील फॉर्म कायम आहे. भारताकडून दोन्ही सामन्यात त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या फॉर्ममध्ये आहेत. तिसऱ्या टी20 मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. राहुल आणि दीपक चाहर यांना संधी मिळू शकते. यजमान विंडीजसमोर मोठी आव्हाने आहेत. त्यांच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं. फलंदाजीत दोन्ही सामन्यात सलामीची जोडी अपयशी ठरली. पोलार्ड वगळता एकही फलंदाज फटकेबाजी करू शकला नाही. क्लीन स्वीप टाळण्यासाठी विंडीजला विजयाची गरज आहे.

विराट कोहली घेणार विश्रांती

Loading...

विराट कोहलीला विश्रांतीची गरज असल्यामुळं आजच्या सामन्यात पंचासोबत मैदानाचे परिक्षण करताना रोहित शर्मा हजर होता. तर, विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. त्यामुळं आता शेवटच्या सामन्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद असणार आहे.

भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...