India vs West Indies : घरच्या मैदानावर रोहित @ 400! एका षटकारासह केला वर्ल्ड रेकॉर्ड

India vs West Indies : घरच्या मैदानावर रोहित @ 400! एका षटकारासह केला वर्ल्ड रेकॉर्ड

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहितनं एक विक्रम आपल्या नावावर केला.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अखेर रोहित शर्मानं 400 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. आज मुंबईत होत असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात शेल्डन कॉट्रिएलच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्मान ही कामगिरी केली. कॉट्रिएलच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत रोहित शर्मानं आपल्या 400 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणार रोहित शर्मा भारतीय पहिला खेळाडू ठरला आहे.

तीन टी-20 मालिकेतील महत्त्वाचा असा अखेरचा सामना मुंबईत होत आहे. याआधी दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत. दरम्यान गेल्या दोन सामन्यात शांत असलेली रोहित शर्माची बॅट आज तळपताना दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यात रोहितला ही कामगिरी करता आली नाही. मात्र आपल्या घरच्या मैदानावर रोहितनं हा विक्रम केला.

वाचा-टीम इंडियासाठी करो या मरो! वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 401* षटकार मारले आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू आहे. तर, आंतरराष्ट्रीय स्थरावर तिसरा खेळाडू आहे. याआधी शाहिद आफ्रिदी (476)आणि ख्रिस गेल (534) यांनी ही कामगिरी केली आहे. तर, भारताकडून युवराज सिंगनं 251, सचिन तेंडुलकर 264, सौरव गांगुली 247 षटकार मारले आहेत.

वाचा-बंदीनंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक! 175 चेंडूत केली वादळी द्विशतकी खेळी

वाचा-रोहितला मिळाला नवा पार्टनर! ‘हा’ खेळाडू करणार वन-डेमध्ये पदार्पण

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 टक्कर

टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत-वेस्ट इंडिज एकूण 16वेळा टक्कर झाली आहे. यात 9वेळा भारतीय संघानं बाजी मारली आहे तर 6वेळा वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. तर,आतापर्यंत एक सामना अनिर्णित राहिला आहे. तिरुवनंतपुरम सामन्याआधी टी20मध्ये भारतानं सलग सात सामन्यांमध्ये विडिंजला धुळ चारली आहे.

वाचा-टीम इंडियासाठी मुंबई धोक्याची! ‘या’ तीन मुंबईकरांवर असणार मदार

असा आहे मुंबईतील टीम इंडियाचा रेकॉर्ड

तिसरा सामना मुंबईच्या वानखेडेवर खेळला जाणार आहे. मात्र या मैदानाचा रेकॉर्ड भारतासाठी विशेष चांगला नाही आहे. भारताने आतापर्यंत या मैदानावर 3 टी -20 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी केवळ एक जिंकला आहे. 2017 मध्ये भारतानं श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केले होते. दुसरीकडे वेस्ट इंडीजचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. विशेषत: लेंडल सिमन्स, निकोलस पूरन, एव्हिन लुईस यांनी चांगली खेळी केली आहे. वानखेडे स्टेडियमचा विक्रमही वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे. त्याने येथे दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. 2016 मध्ये त्यांनी येथे इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांचा पराभव केला होता. वेस्ट इंडीज संघानं वानखेडेवर भारताला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्य सामन्यात पराभूत केले होते. भारतानं दिलेल्या 193 धावांचे लक्ष 7 विकेट राखत विंडिजनं पार केले होते. या सामन्यात लेंडल सिमन्सने 51 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी केली. सिमन्सने रविवारी तिरुअनंतपुरममध्ये आपल्या संघासाठी 67 धावांची विजयी खेळीही खेळली.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 07:29 PM IST

ताज्या बातम्या