IND vs WI : 'विराट तू स्वार्थी आहेस', रोहितला विश्रांती दिल्यानं चाहते भडकले

IND vs WI : 'विराट तू स्वार्थी आहेस', रोहितला विश्रांती दिल्यानं चाहते भडकले

India vs West Indies : विराट आणि रोहित यांच्यातील वाद काही संपेना. चाहतेही आता विराटवर भडकले आहेत.

  • Share this:

गयाना, 07 ऑगस्ट : भारताने विंडीजविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात विंडीजने दिलेले 146 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली. भारताचा गोलंदाजी दीपक चाहरनं तीन षटकांत फक्त 4 धावा देत विंडीजचे तीन गडी बाद केले. त्यानं केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे विंडीजला 146 धावांत रोखता आलं. चाहरनं सामनावीर पुरस्कार पटकावला.

दरम्यान या सामन्यात विराटनं महत्त्वाचे बदल करत रोहित शर्माला विश्रांती दिली. त्याच्याजागी केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले होते. तसेच, जडेजाला विश्रांती देत राहुल चहरला संघात सामिल केले. रोहितनं पहिल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या सामन्यात केलेल्या अर्धशतकामुळं भारतानं हा सामना जिंकला. त्यामुळं चाहत्यांनी, विराचनं स्वार्थापायी रोहितला संघात घेतलं नाही, अशी टीका केली. विराटनं तिसऱ्या टी-20 सामन्यात युवा खेळाडूंना संधी दिली. मात्र रोहितला संघाबाहेर बसवल्याबद्दल चाहते विराटवर चांगलेच भडकले.

वाचा- INDvsWI : भारताविरुद्ध पोलार्डचे 6 षटकार, 7 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली!

वाचा-पंतच्या विक्रमी खेळीनंतर विराट कोहलीनं केलं कौतुक

दरम्यान तिसऱ्या सामन्यात विराटनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक चहरच्या तीन विकेटच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजला 146 धावांवर रोखले. विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि केएल राहुल लवकर बाद झाले. धवन 20 धावांवर तर राहुल 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत आणि कोहलीनं ड़ावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी शतकी भागिदारी करून संघाला विजयाच्या समीप नेलं. 18 व्या षटकात विराट कोहली 59 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत आणि मनीष पांडे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. रिषभ पंतने 20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला. ऋषभ पंतने 42 चेंडूत 65 धावांची खेळी केली.

याआधी विराट आणि रोहित यांच्यातील वादाच्या चर्चा वाढल्या होत्या. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी विराटनं या सगळ्या निव्वल अफवा असल्याचे सांगत, या चर्चांचे खंडण केले होते. मात्र अजूनही यांच्यातील वाद संपला आहे असे चित्र दिसत नाही आहे.

वाचा-गब्बरची अशीही हॅट्ट्रिक, टीम इंडियातून बाहेर जाणार?

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 02:12 PM IST

ताज्या बातम्या