मुंबई, 10 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा आणि महत्त्वपूर्ण टी-20 सामना मुंबईत 11 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियानं तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं विजय मिळवल्यामुळं टी-20 मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान दोन्ही टी-20 सामन्यात सलामीवीर रोहित शर्माला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही.
तिसरा टी-20 सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. या सामन्यात भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दरम्यान या दौऱ्यातील दोन्ही सामन्यात रोहित शर्माला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दोन्ही सामन्यात रोहित शर्मा लवकर बाद झाला. मात्र, या सामन्याआधी रोहित शर्माचा एक वेगळा अवतार पाहायला मिळाला. बीसीसीआयनं अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये रोहितचा हा अवतार दिसला.
वाचा-शिखर धवन वन डे घेणार संघातून माघार? ‘या’ 4 खेळाडूंना मिळू शकते संधी
बऱ्याच काळानंतर रोहित शर्माला क्लिन शेववाला अवतार पाहायला मिळाला. वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माचा बिअर्डवाला अवतार दिसत होता. मात्र अचानक रोहितनं आपला अवतार का बदलला असे विचारल्यावर त्यानं एक वेगळेच कारण दिले. रोहित शर्माच्या या नव्या अवतारामागे कारण आहे त्याची मुलगी समायरा. बीसीसीआय टीव्हीवर युजवेंद्र चहलनं घेतलेल्या मुलाखतीत रोहित शर्मानं खरे कारण सांगितले.
वाचा-धोनीबद्दल शास्त्रींचा मोठा खुलासा, 'त्याला विश्रांती घ्यायची होती पण...'
MUST WATCH: Rapidfire ft. Kuldeep, Chahal and the HITMAN 😃😎
Many fun facts from the spin twins @yuzi_chahal & @imkuldeep18 on the questions curated by @ImRo45 🗣️ - by @RajalArora
Full Video Link here 📽️👉👉 https://t.co/taEVM9Prur pic.twitter.com/00aBUSmcV5
— BCCI (@BCCI) December 10, 2019
वाचा-मुंबई इंडियन्स लावणार 'विराट'वर बोली, लिलावात हे 5 खेळाडू रडारवर
या कारणामुळे रोहितनं बदलला अवतार
या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहलनं रोहित शर्माला, क्लिन शेव का केले? असा प्रश्न विचारला. यावर रोहित शर्मानं, “नव्या अवतारा मागे काही खास कारण नाही आहे. माझ्या मुलीला दाढी आवडत नाही. समायरा दाढीमुळे माझ्यासोबत खेळत नाही, माझ्या जवळ येत नाही. त्यामुळं मी दाढी काढण्याचा निर्णय घेतला”, असे सांगितले. भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं. वर्ल्ड कप दरम्यान आणि आयपीएलमध्ये रोहितला सपोर्ट करण्यासाठी समायरा मैदानात उपस्थित असायची. आता तिसरा टी-20 सामना मुंबईत होणार असल्यामुळे समायरा मैदानात दिसू शकते.