IND vs WI : ‘टी-20 वर्ल्ड कप नाही, सध्या फक्त मालिका जिंकायची आहे’

IND vs WI : ‘टी-20 वर्ल्ड कप नाही, सध्या फक्त मालिका जिंकायची आहे’

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय खेळाडूचे धक्कादायक वत्तव्य.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 11 डिसेंबरला मुंबईमध्ये वानखेडे मैदानावर तिसरा सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा सामना महत्त्वाचा आहे, कारण सध्या दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळं मालिका जिंकण्याच्या दृष्टीनं तिसरा सामना महत्त्वाचा आहे.

टीम इंडियानं पहिल्या सामन्यात 6 विकेटनं विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामना विडिंजनं 8 विकेटने जिंकला. या मालिकेचा अखेरचा सामना 11 डिसेंबरला होणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्मानं एक मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्मानं सामन्याआधी आमचे लक्ष सध्या वर्ल्ड कप जिंकणे नाही तर ही मालिका जिंकणे आहे, असे सांगितले.

तिसऱ्या सामन्याआधी रोहित शर्मानं, “टी-20 वर्ल्ड कपसाठी आम्ही तयारी करत आहोत, असे म्हणणार नाही. वर्ल्ड कपसाठी अजून बराच कालावधी आहे. संघाचे लक्ष त्यामुळं फक्त मालिका विजयाकडे आहे”, असे विधान केले. तसेच, “सध्या टीम चांगल्या स्थितीत आहे. जर आम्ही सातत्याने सामना जिंकत राहिलो, तर मैदानावर सतत योग्य गोष्टी करत राहिलो तर संघ आपोआप चांगल्या स्थितीत पोहोचेल”, असेही रोहित शर्मा म्हणाला.

वाचा-लेक जवळ येत नाही म्हणून रोहित शर्मानं लढवली शक्कल, नव्या अवतारात आला समोर

वानखेडेचे रेकॉर्ड भारतासाठी चिंताजनक

तिसरा सामना मुंबईच्या वानखेडेवर खेळला जाणार आहे. मात्र या मैदानाचा रेकॉर्ड भारतासाठी विशेष चांगला नाही आहे. भारताने आतापर्यंत या मैदानावर 3 टी -20 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी केवळ एक जिंकला आहे. 2017 मध्ये भारतानं श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केले होते. दुसरीकडे वेस्ट इंडीजचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. विशेषत: लेंडल सिमन्स, निकोलस पूरन, एव्हिन लुईस यांनी चांगली खेळी केली आहे. वानखेडे स्टेडियमचा विक्रमही वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे. त्याने येथे दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. 2016 मध्ये त्यांनी येथे इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांचा पराभव केला होता.

वाचा-शिखर धवन वन डे घेणार संघातून माघार? ‘या’ 4 खेळाडूंना मिळू शकते संधी

असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.

वाचा-मुंबई इंडियन्स लावणार 'विराट'वर बोली, लिलावात हे 5 खेळाडू रडारवर

वेस्टइंडीज: कीरोन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन एलेन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, खॅरी पियरे, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विलियम्स, हेडन वॉल्स ज्युनिअर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 06:57 PM IST

ताज्या बातम्या