IND vs WI : टीम इंडियासाठी मुंबई धोक्याची! ‘या’ तीन मुंबईकरांवर असणार मदार

IND vs WI : टीम इंडियासाठी मुंबई धोक्याची! ‘या’ तीन मुंबईकरांवर असणार मदार

वानखेडे मैदानावर हे तीन मुंबईकरच टीम इंडियाला मिळवून देऊ शकतात मालिका विजय.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज मुंबईत होणार आहे. दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकल्यामुळं तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळं मुंबईत होणारा तिसरा सामना रोमांचक असेल, यात काही वाद नाही.

यजमान इंडियाने तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेचा पहिला सामना जिंकला. दुसरा सामना पाहुण्या टीम वेस्ट इंडीजच्या नावावर झाला. आता बुधवारी तिसर्‍या टी -२० सामन्यात (मुंबई टी -२०) दोन्ही संघ आमने-सामने असतील. हा मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामनादेखील आहे. दुसरा सामना वेस्ट इंडीज संघाने ज्या पद्धतीने जिंकला, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. तर भारतीय संघाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. असे असले तरी, मुंबईत सामना जिंकणे टीम इंडियासाठी सोपे नसणार आहे.

मुंबईला क्रिकेटची पंढरी मानले जात असले तरी, टीम इंडियासाठी टी-20 रेकॉर्ड विशेष खास राहिलेले नाहीत. त्यामुळं आता टीम इंडियाची जबाबदारी ही रोहित शर्मा, शिवम दुबे आणि श्रेयस अय्यर या तीन मुंबईकर खेळाडूंवर असणार आहे. रोहित शर्माबाबत बोलायचे झाल्यास या दौऱ्यात अद्याप हिटमॅनची बऍट तळपली नाही आहे. त्यामुळं तिसऱ्या सामन्यात रोहितकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. तर, दुसरीकडे शिवम दुबेनं दुसऱ्या सामन्यात केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे त्याचे मनोबल वाढले आहेत. श्रेयस अय्यरनेही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं या तीन मुंबईकरांवर मालिकेची मदार असणार आहे.

वाचा-‘टी-20 वर्ल्ड कप नाही, सध्या फक्त मालिका जिंकायची आहे’

असा आहे मुंबईतील टीम इंडियाचा रेकॉर्ड

तिसरा सामना मुंबईच्या वानखेडेवर खेळला जाणार आहे. मात्र या मैदानाचा रेकॉर्ड भारतासाठी विशेष चांगला नाही आहे. भारताने आतापर्यंत या मैदानावर 3 टी -20 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी केवळ एक जिंकला आहे. 2017 मध्ये भारतानं श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केले होते. दुसरीकडे वेस्ट इंडीजचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. विशेषत: लेंडल सिमन्स, निकोलस पूरन, एव्हिन लुईस यांनी चांगली खेळी केली आहे. वानखेडे स्टेडियमचा विक्रमही वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे. त्याने येथे दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. 2016 मध्ये त्यांनी येथे इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांचा पराभव केला होता. वेस्ट इंडीज संघानं वानखेडेवर भारताला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्य सामन्यात पराभूत केले होते. भारतानं दिलेल्या 193 धावांचे लक्ष 7 विकेट राखत विंडिजनं पार केले होते. या सामन्यात लेंडल सिमन्सने 51 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी केली. सिमन्सने रविवारी तिरुअनंतपुरममध्ये आपल्या संघासाठी 67 धावांची विजयी खेळीही खेळली.

वाचा-लेक जवळ येत नाही म्हणून रोहित शर्मानं लढवली शक्कल, नव्या अवतारात आला समोर

असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.

वाचा-मुंबई इंडियन्स लावणार 'विराट'वर बोली, लिलावात हे 5 खेळाडू रडारवर

वेस्टइंडीज: कीरोन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन एलेन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, खॅरी पियरे, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विलियम्स, हेडन वॉल्स ज्युनिअर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 11:05 AM IST

ताज्या बातम्या