India vs West Indies : ‘विराट तुने क्या किया?’, ऋषभ पंतमुळे सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल

India vs West Indies : ‘विराट तुने क्या किया?’, ऋषभ पंतमुळे सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल

टीम इंडियाला मालिका विजय तरी, सोशल मीडियावर ट्रोल झाला विराट.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात वानखेडेवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. भारतानं दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग विडिंजला करता आला नाही परिणामी टीम इंडियानं 2-1नं ही मालिका जिंकली. विराट, केएल राहुल आणि रोहित शर्मा या त्रिकुटानं जबरदस्त कामगिरी केली. मात्र या सामन्यात विराट, केएल राहुल आणि रोहित या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली असली तरी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होता तो ऋषभ पंत.

विडिंजविरोधात प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी 135 धावांची भागीदारी केली. मात्र 12व्या ओव्हरमध्ये 71 धावा करत रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर उतरेल असे वाटत असताना कोहलीनं ऋषभ पंतला मैदानावर पाठवण्याचा निर्णय घेतला. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यातही कोहलीनं शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. मात्र दुबेनं अर्धशतकी खेळी केली होती. मात्र आजच्या सामन्यात ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीच्या या निर्णयाला ट्रोल करण्यात येत आहे.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पंतवर टीका करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिक दौऱ्यापासून पंतला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात पंतनं 33 धावांची खेळी केली होती. मात्र त्याला सतत पाठिशी घातले जात असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. पंत शुन्यावर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनला संघात जागा का देत नाही, असा सवालही विचारला जात आहे.

याआधीही बांगलादेश मालिकेत संजूला बाकावर बसवून ठेवण्यात आले होते. या मालिकेतही शिखर धवननं माघार घेतल्यामुळं संघात जागा मिळवलेल्या संजूला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळं सोशल मीडियावर सध्या पंतबरोबरच विराटलाही ट्रोल केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 07:14 AM IST

ताज्या बातम्या