India vs West Indies : ‘पंत-एक घोटाळा’, नेटकऱ्यांनी ऋषभवर आजीवन बंदी घालण्याची केली मागणी

India vs West Indies : ‘पंत-एक घोटाळा’, नेटकऱ्यांनी ऋषभवर आजीवन बंदी घालण्याची केली मागणी

विराट, केएल राहुल आणि रोहित या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली असली तरी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होता तो ऋषभ पंत.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात वानखेडेवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. विराट, केएल राहुल आणि रोहित शर्मा या त्रिकुटानं जबरदस्त कामगिरी केली. मात्र या सामन्यात विराट, केएल राहुल आणि रोहित या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली असली तरी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होता तो ऋषभ पंत.

विडिंजविरोधात प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी 135 धावांची भागीदारी केली. मात्र 12व्या ओव्हरमध्ये 71 धावा करत रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर उतरेल असे वाटत असताना कोहलीनं ऋषभ पंतला मैदानावर पाठवण्याचा निर्णय घेतला. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यातही कोहलीनं शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. मात्र दुबेनं अर्धशतकी खेळी केली होती. मात्र आजच्या सामन्यात ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर ट्वीटरवर पंत हा एक घोटाळा असल्याचे ट्वीट केले आहे.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पंतवर टीका करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिक दौऱ्यापासून पंतला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात पंतनं 33 धावांची खेळी केली होती. मात्र त्याला सतत पाठिशी घातले जात असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. पंत शुन्यावर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनला संघात जागा का देत नाही, असा सवालही विचारला जात आहे.

याआधीही बांगलादेश मालिकेत संजूला बाकावर बसवून ठेवण्यात आले होते. या मालिकेतही शिखर धवननं माघार घेतल्यामुळं संघात जागा मिळवलेल्या संजूला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळं सोशल मीडियावर सध्या पंतबरोबरच विराटलाही ट्रोल केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 09:41 PM IST

ताज्या बातम्या