IND vs WI : अखेरच्या सामन्यावरही पावसाचे सावट, असे असेल हवामान

IND vs WI : अखेरच्या सामन्यावरही पावसाचे सावट, असे असेल हवामान

India vs West Indies : तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी भारतानं घेतली आहे.

  • Share this:

गयाना, 06 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या अखेरच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी भारतानं घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवत त्यांना क्लिन स्विप देण्याच्या विचारात भारतीय संघ आहे. पहिले दोन सामने फ्लोरिडाला झाल्यानंतर अखेरचा सामना गयाना येथील प्रोविडेंस मैदानावर खेळला जाणार आहे.

मात्र, दुसऱ्या सामन्याप्रमाणे या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. दुसऱ्य़ा टी-20 सामन्यात त्यामुळे वेस्ट इंडिजला 15 ओव्हर फलंदाजी करता आली होती. पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे हा सामना थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं डकवर्थ-लुईस नियमांनुसार या सामन्यात भारताला विजयी घोषित करण्यात आले होते.

दरम्यान, हवामान खात्यानुसार मंगळवारी संपूर्ण दिवस पाऊस पडू शकतो. सध्या पाऊस पडत असला तरी, जर सामना झाल्यास एक-दोन तास टॉस होण्यास विलंब होईल. सकाळपासून या परिसरात पाऊस पडत असल्यामुळं सामना उशीरा सुरु होऊ शकतो जर पाऊस थांबला नाही तर भारत ही मालिका 2-0ने जिंकेल.

वाचा-शेवटच्या सामन्यात रोहितला मिळू शकते विश्रांती, तर 'या' खेळाडूंना मिळणार संधी

वाचा-अखेर जमलं! हिटमॅननं चक्क पकडली कोहलीच्या नावाची पाटी, VIDEO VIRAL

या सामन्यात युवा खेळाडूंना मिळू शकते संधी

भारतीय कर्णधार विराट कोहलीनं दुसरा सामना जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येईल असे संकेत दिले होते. त्यामुळं रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी विश्रांती देऊन केएल राहुल आणि राहुल चहर याला संघात घेतले जाऊ शकते. तसेच ऋषभ पंतच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते.

येथे पाहू शकता India vs West Indies यांच्यातील टी-20 सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा टी-20 सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे.

वाचा-वेस्ट इंडिजला मोठा धक्का, सामन्याआधीच पोलार्डवर झाली कारवाई

VIDEO : लोकसभेत असं काय बोलल्या नवनीत राणा की, अमित शहांनाही आलं हसू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या