India vs West Indies : किंग कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी! मास्टर ब्लास्टरच्या विक्रमांना धोका

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आपल्य़ा 43व्या एकदिवसीय शतकासह वेस्ट इंडिज विरोधात 9 शतक पूर्ण केले.

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 03:12 PM IST

India vs West Indies : किंग कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी! मास्टर ब्लास्टरच्या विक्रमांना धोका

त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर विराटसेनेनं वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही भारताने जिंकली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं पुन्हा एकदा शतकी खेळी करत, त्रिनिदादमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. विराटनं आपल्या कारकिर्दीत केलेले हे 43वे एकदिवसीय शतक आहे. तसेच, एका दशकात 20 हजार धावा करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराटनं केलेल्या 120 धावांसह त्यानं अनेक दिग्गज फलंदाजांचे विक्रम मोडले. तर, विराटनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विजयाची बरोबरी केली.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळं सामना 35 षटकांचा खेळवण्यात आला. विंडीजनं 7 बाद 240 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 35 षटकांत 255 धावांचे आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 32.3 षटकांतच 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात . दुसऱ्या सामन्याप्रमाणे यावेळी पुन्हा श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी शतकी भागिदारी केली. या मालिकेत विराटने सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार पटकावला.

Loading...

वाचा-अंगठ्याला दुखापत झाल्यानंतरही खेळला विराट, सामन्यानंतर म्हणाला...

विराटनं मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आपल्य़ा 43व्या एकदिवसीय शतकासह वेस्ट इंडिज विरोधात 9 शतक पूर्ण केले. याबरोबरच त्यानं एका देशाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मात्र, सचिनला 9 शतकांची खेळी करण्यासाठी 70 डावांचा वापर करावा लागला. मात्र विराट कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात शतकी खेळी ही 35 डावांत केली.

वाचा-धोनी सीमेवर तर झिवा म्हणते,'देश का सिपाही हूं'; VIDEO होतोय व्हायरल

रोहित शर्मा आणि ऋषभ पंत पुन्हा फेल

डकवर्थ लुईसनुसार भारताला 255 धावांचं आव्हान मिळालं. भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा 10 धावांवर बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही रोहितला विशेष चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर विराट आणि धवनने दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या फाबियान एलेननं 13 व्या षटकात धवन आणि पंतला लागोपाठ बाद केलं. ऋषभ पंतला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भोपाळाही फोडता आला नाही. त्यामुळं आता ऋषभ पंतला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर डच्चू मिळू शकतो.

वाचा-स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांत टीम इंडियानं पहिल्यांदाच केली ही कामगिरी

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...