Elec-widget

धोनीला सापडला पर्याय, पंत नाही तर 'ही' तीन नावे चर्चेत!

धोनीला सापडला पर्याय, पंत नाही तर 'ही' तीन नावे चर्चेत!

महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थित संघात जागा मिळालेल्या ऋषभ पंतला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.

  • Share this:

त्रिनिदाद, 13 ऑगस्ट : भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटता सुटत नाही आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. 21 वर्षीय विकेटकिपर पंत चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र त्याला त्याच्या खेळीत सातत्य राखता आले नाही.

महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यानंतर ऋषभ पंतला संघात सामिल करण्यात आला. वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन जखमी झाल्यानंतर ऋषभ पंतची संघात वर्णी लागली होती. मात्र बेजबाबदारपणे सेमीफायनल सामन्यात फलंदाजी केल्यामुळं पंतवर टीका करण्यात आली होती.

असाच प्रकार पंतनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला, बेजबाबदारपणे शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. पंत बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 101 अशी झाली होती. त्यावेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 125 धावांची भागिदारी केली. त्यामुळं आता पंतचे चौथ्या क्रमांकाचे स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळं पंतचे स्थान घेण्यासाठी ही तीन फलंदाज सज्ज आहेत.

वाचा-ऋषभ पंतचे स्थान धोक्यात? गावसकर यांनी सांगितला चौथ्या क्रमांकाचा दावेदार

इशान किशन: धोनीच्याच राज्यातील आणि त्याच्याप्रमाणे झारखंडमधून क्रिकेटला सुरुवात करणारा इशान किशन या भारतीय संघासाठी दावेदार असू शकतो. 20 वर्षीय इशान केशननं प्रथम श्रेणी आणि आयपीएल स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2019च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशननं, आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. इशान धोनीसारखाच आक्रमक असून तो, कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो. आयपीएलमध्ये त्यानं विकेटकीपर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीनंतर संघात इशान किशनला जागा मिळू शकते.

Loading...

वाचा-भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणारे गॅरी कर्स्टन आता होणार 'या' संघाचे कोच!

संजु सॅमसन : एकदिवसीय क्रिकेटमध्ये संजु सॅमसनची निवड आतापर्यंत न झाल्यामुळं चाहते हैराण आहेत. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना संजुनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र, 24 वर्षीय संजुनं प्रथम श्रेणीत केवळ 36.81च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. भारताची कमकुवत बाजू असलेल्या चौथ्या क्रमांकाचा तो योग्य दावेदार होऊ शकतो. त्याचरोबर आयपीएलमध्ये विकेटकिपींग करणारा सॅमसन एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी योग्य ठरू शकतो.

वाचा-श्रेयस अय्यर बनला 'टारझन', शेअर केला खतरनाक स्टंटचा व्हिडिओ

अंकुश बॅंस : अंकुश बॅंस भारतीय संघातील मोठे नाव नसले तरी, त्यानं अंडर-19 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2014मध्ये अंडर-19मध्ये त्यानं यशस्वी अर्धशतकी खएळी केली. त्यानं आतापर्यंत 36 टी-20 सामने खेळले आहेत. यात 23.74च्या सरासरीनं 736 धावा केल्या आहेत. हिमाचल प्रदेशकडून क्रिकेट खेळणारा हा 23 वर्षीय क्रिकेटपटू भारतीय संघात ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो.

वाचा-काश्मीर मुद्द्यावरून ईद दिवशीच अख्तर आणि सर्फराज बरळले!

VIDEO: हनी ट्रॅपच्या प्रकरणात भर रस्त्यात तरुणाला काठ्यांनी मारलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Aug 13, 2019 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...