श्रेयस अय्यर बनला 'टारझन', शेअर केला खतरनाक स्टंटचा व्हिडिओ

श्रेयस अय्यर बनला 'टारझन', शेअर केला खतरनाक स्टंटचा व्हिडिओ

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 14 ऑगस्टला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. त्याआधी भारतीय संघ त्रिनिदादमध्ये मस्ती करत आहेत.

  • Share this:

त्रिनिदाद, 13 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरनं 71 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळं श्रेयस अय्यर 14 ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज आहे. दरम्यान या तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघ सध्या मज्जा मस्ती करताना दिसत आहे. यात श्रेयस अय्यरचा टार्झनवाला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान दुसऱ्या सामन्यात श्रेयसनं विराट कोहलीसोबत शतकी भागिदारी करत भारताला मोठ्या आव्हानाचा डोंगर उभा करून दिला. त्यामुळं त्याच्या या खेळीमुळं श्रेयसनं तिसऱ्या सामन्यात आपलं स्थान पक्कं केले आहे. दरम्यान श्रेयसनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओत तो टार्झनसारखा हवेतून पाण्यात उडी मारताना दिसत आहेत. यावर श्रेयसनं, "तुम्ही मला सांगू शकत नाही की, मी हवेत उडू शकत नाही", असे कॅप्शन लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

You can’t tell me I ain’t fly!

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

वाचा-भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणारे गॅरी कर्स्टन आता होणार 'या' संघाचे कोच!

विराटनं केले अय्यरचे कौतुक

श्रेयस अय्यरच्या खेळीचं विराट कोहलीनं कौतुक केलं. भारताच्या आघाडीच्या फळीतील एखादा तरी फलंदाज मोठी खेळी करतो. पण या सामन्यात रोहित-धवन लवकर बाद झाले त्यानंतर मोठी खेळी करणं आणि संघाचा डाव सावरणं गरजेचं होतं. श्रेयसचा आत्मविश्वास चांगला आहे. त्याला कधी सिंगल-डबल घ्यायची आणि कधी मोठे फटके मारायचे हे माहिती आहे. त्याच्या फलंदाजीनं माझं काम सोपं झाल्याचं विराट कोहली म्हणाला.

वाचा-पाक क्रिकेटपटू भारतीय मुलीसोबत 20 ऑगस्टला अडकणार विवाहबंधनात!

श्रेयस करणार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी?

दुसऱ्या सामन्यात पंत बेजबाबदारपणे शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. पंत बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 101 अशी झाली होती. त्यावेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 125 धावांची भागिदारी केली. त्यामुळं भारचीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरची उत्तम असल्याचे मत व्यक्त केले. तर, ऋषभ पंतहा महेंद्रसिंग धोनीसारखा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. तसेच, श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकाचा योग्य दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा-कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी अजिंक्य रहाणेची मदत, इतरांनाही केलं आवाहन!

श्रेयसच्या नावावर 6 डावांत 3 अर्धशतक

श्रेयस अय्यरनं आपल्या शानदार खेळीच्य़ा जोरावर 8 एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतकांच्या जोरावर 281 धावा केल्या आहेत. यात त्यानं केवळ 6 डावांत फलंदाजी केली. पाचव्या क्रमांकावर तीन वेळा खेळत त्यानं 119 धावा केल्या आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 162 धवा केल्या आहेत. त्याची सरासरी 46.83 असून स्ट्राईक रेट 98.25 आहे.

वाचा-सचिन म्हणाला, विराटनं माझा 100 शतकांचा मोडला तर...

तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण

Published by: Suraj Yadav
First published: August 13, 2019, 2:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading