‘पंत तू तर वन डे क्रिकेट खेळण्याच्या लायकीचा नाहीस!'

‘पंत तू तर वन डे क्रिकेट खेळण्याच्या लायकीचा नाहीस!'

वेस्ट इंडिज विरोधात पंत बेजबाबदार शॉट मारत बाद झाला

  • Share this:

त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर विराटसेनेनं वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही भारताने जिंकली. मात्र, या सामन्यातही विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं ऋषभ पंतच्या खेळीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण त्रिनिदादमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर खातंही न उघडताच बाद झाला.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळं सामना 35 षटकांचा खेळवण्यात आला. विंडीजनं 7 बाद 240 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 35 षटकांत 255 धावांचे आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 32.3 षटकांतच 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मात्र, या सामन्यातही ऋषभ बेजबाबदार शॉट खेळत बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत 20 धावा करत बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यात शिखर धवन बाद झाल्यानंतर क्रिझवर आलेल्या पंतनं पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. त्यामुळं पंतच्या या खेळीवर चाहत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

चाहत्यांनी पंतवर केली जहरी टीका

वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामन्यातही पंत बेजबाबदार शॉट मारत बाद झाला होता. असाच प्रकार वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या दोन्ही सामन्यात घडला. त्यामुळं सोशल मीडियावर चाहत्यांनी पंतवर टीका करण्यात सुरुवात केली आहे. चाहत्यांनी पंतला फक्त टी-20 खेळण्याचा सल्ला दिला आहे. तर, काहींनी ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी देऊच नये असे मत व्यक्त केले आहे. याआधी गावसकर यांनीही ऋषभ पंतच्या जागी श्रेयस अय्यरला जागा चौथ्या क्रमांकावर जागा द्यावी असे सांगितले होते. दरम्यान पंतचा असा खेळ पाहून विराटसुद्धा चकीत झाला. त्याच्या चुकीवर काय बोलणार असेच भाव विराटच्या चेहऱ्यावर होते. भविष्यात धोनीची जागा पंत घेणार आहे. पण बेजबाबदार फटके मारून पंत बाद होत असल्यानं अशी जागा घेणार का? असाच प्रश्न विचारला जात आहे.

वाचा-किंग कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी! मास्टर ब्लास्टरच्या विक्रमांना धोका

वाचा-पंत तू अशी घेणार का धोनीची जागा? विराटचे भाव सर्वकाही सांगून गेले

चौथ्या क्रमांकावर पंत असफल

आतापर्यंत अनेकवेळा पंतनं त्याला मिळालेली संधी गमावली आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, टी20 मालिकेत आणि दुसऱ्या सामन्यातही पंत चुकीच्या फटक्यामुळं बाद झाला. त्यानं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली. पंतने गेल्या दोन्ही सामन्यात विकेट गमावल्यानंतर श्रेयस अय्यरनं जबरदस्त खेळी केली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्यानं दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केली.

वाचा-स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांत टीम इंडियानं पहिल्यांदाच केली ही कामगिरी

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या