India vs West Indies : कॅप्टन कोहलीची 'विराट' खेळी, वेस्ट इंडिजला 280 धावांचे तगडे आव्हान

India vs West Indies : कॅप्टन कोहलीची 'विराट' खेळी, वेस्ट इंडिजला 280 धावांचे तगडे आव्हान

विराटनं एका संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याचा विक्रमही केला.

  • Share this:

त्रिनिदाद, 11 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतानं 279 धावांपर्यंत मजल मारली. तब्बल 11 डावांनंतर विराटनं आपले 42वे शतक पूर्ण केले. याचबरोबर विराटनं एका संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याचा विक्रमही केला. वेस्ट इंडिज विरोधात विराटचे हे सहावे शतक आहे. दरम्यान या सामन्यात पाचव्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. मात्र, तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये रवींद्र जडेजानं 16 धावा केल्या.

तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतानं संघात कोणतेही बदल केले नाहीत. मात्र, सलामीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. शिखर धवन केवळ 2 धावांवर बाद झाला. पहिल्याच ओव्हरमध्ये शेल्डन कॉटलरनं शिखरला बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटनं 14व्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत आपलं अर्धशतकी खेळी पूर्ण विराट आणि रोहितनं 74 धावांची भागिदारी केली, मात्र रोहितला 34 चेंडूत फक्त 18 धावा करता आल्या. तर, चौथ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत 20 धावा करत बाद झाला.

दोन महिन्यांनंतर शतकी कामगिरी केल्यानंतर 42व्या ओव्हरमध्ये 125 चेंडूत 120 धावा करत विराट बाद झाला. 43 ओव्हरमध्ये पावसामुळं काही काळ सामना थांबवण्यात आला. श्रेयस अय्यरनं आणि जाधवनं आक्रमक फलंदाजी केली मात्र, अय्यर 71 धावांवर बाद झाला. केदार जाधव 16 तर भुवनेश्वर कुमार 1 धावा करत बाद झाला. वेस्ट इंडिजकडून ब्रेथवेटनं सर्वात जास्त तीन विकेट घेतल्या.

विक्रमांचा विराट बादशाह!

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या तरी संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याती कामगिरी विराटनं केली आहे. विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना 6 शतक लगावण्याती कामगिरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त 5 शतक लगावले होते. तर, सचिन तेंडुलकरच्या नावावर संघाविरोधात सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम आहे. सचिननं ऑस्‍ट्रेलियाविरोधात 9 शतक लगावले आहेत. तर, श्रीलंके विरोधात 8 शतक. कोहलीनं श्रीलंका, ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज विरोधात प्रत्येकी 8 शतक लगावले आहेत.

विराटनं मोडला जावेद मियाँदादचा विक्रम

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. कर्णधार कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात फलंदाजी करताना 20 धावा करत पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडला. विराटनं पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचा विक्रम मागे टाकला आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी 1993 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. मियाँदाद यांनी विंडीजविरुद्ध 64 डावात 1930 धावा केल्या होत्या. विराटनं फलंदाजी करताना केवळ 19 धावा करत 34 डावांमध्ये मियॉंदाद यांचा हा विक्रम मोडला. विराटच्या या खेळीत सात शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. या तुलनेत मियाँदाद यांनी फक्त एक शतक आणि 12 अर्धशतकं केली आहेत.

वाचा-धोनीच्या घरी आला नवा पाहूणा! साक्षी करतेय माहीला मिस

VIDEO : 'त्या' बचावामागची खरी कहाणी; 'तो' माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या