India vs West Indies : टीम इंडियासाठी स्पेशल आहे 15 ऑगस्ट, 72 वर्षांनंतर मिळणार मोठी संधी!

India vs West Indies : टीम इंडियासाठी स्पेशल आहे 15 ऑगस्ट, 72 वर्षांनंतर मिळणार मोठी संधी!

टी-20 सामन्यात क्लिन स्वीप मिळाल्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्येही अशी कामगिरी करण्यास सज्ज आहे.

  • Share this:

त्रिनिदाद, 14 ऑगस्ट : भारतानं वेस्ट इंडीज विरुद्धची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये अखेरचा सामना होणार आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. त्यामुळं आता शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताचे मालिका विजयाचं लक्ष्य असेल.

दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाकडे एक मोठी संधी आहे. टीम इंडिया तब्बल 72 वर्षांनी स्वातंत्र्यदिनी विजयाची भेट चाहत्यांना देऊ शकतात. आज वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघा शेवटचा एकदिवसीय सामने खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. मात्र, हा सामना भारतीय वेळेनुसार 15 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळं भारतीयांना एक मोठी भेट टीम इंडिया देऊ शकते. दरम्यान वेस्ट इंडीजसाठी एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तसेच तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. त्यामुळं वेस्ट इंडीजचा संघ गेलला विजयी निरोप देण्यासाठी मैदानात उतरेल.

भारतीय संघानं स्वातंत्र्यदिनी खुप कमी सामने खेळले आहेत. आतापर्यंत पाच वेळा 15 ऑगस्टला भारतीय संघानं आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हे सर्व सामने कसोटी सामने होते. दरम्यान एकदिवसीय सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास ही दुसरी वेळ आहे, 14 ऑगस्टला सामना खेळण्याची. याआधी 14 ऑगस्ट 1993मध्ये श्रीलंकेसोबत लढत झाली होती. त्यावेळी भारताचा 4 विकेटनं पराभव झाला होता.

वाचा-विराटसेना एकदिवसीय मालिकाही जिंकणार? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

असे आहे भारताचे 15 ऑगस्टचे रिपोर्टकार्ड

15-18 ऑगस्ट 1936, विरुद्ध इंग्लंड – इंग्लंडचा 9 विकेटनं विजय

14-19 ऑगस्ट 1952, विरुद्ध इंग्लंड- सामना अनिर्णीत सामना

14-17 ऑगस्ट 2001, विरुद्ध श्रीलंका- श्रीलंकेचा 10 विकेटनं विजय

15-17 ऑगस्ट 2014, विरुद्ध इंग्लंड- इंग्लंडचा 244 धावांनी विजय

12-15 ऑगस्ट 2015, विरुद्ध श्रीलंका- श्रीलंकेचा 63 धावांनी विजय

वाचा-गब्बरमुळे टीम इंडियात 'या' खेळाडूवर होतोय अन्याय?

प्रजासत्ताक दिनीही भारताला मिळाला नाही विजय

1986मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला 36 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तर, 2000मध्ये भारताला ऑस्ट्रेलियानं 152 धावांनी पराभूत केले होते. त्यामुळं आजचा एकदिवसीय सामना भारतासाठी महत्त्वाचा असेल.

या चॅनलवर पाहू शकता सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा अखेरचा सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे.

वाचा-युनिव्हर्सल बॉसचा अखेरचा सामना, इच्छा राहणार अपुरी

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर (कर्णधार) केमार रोच.

वाचा-धोनीला सापडला पर्याय, पंत नाही तर 'ही' तीन नावे चर्चेत!

पूरग्रस्त भागात दुधामध्ये मिसळतंय नदीचे पाणी? VIRAL VIDEOचं हे आहे सत्य

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2019, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading