India vs West Indies : रोहितला खुणावतोय युवराजचा विक्रम! हव्यात फक्त 26 धावा

हिटमॅन रोहित शर्माला आज सिक्सर किंग युवराज सिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 06:03 PM IST

India vs West Indies : रोहितला खुणावतोय युवराजचा विक्रम! हव्यात फक्त 26 धावा

वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा वेस्ट इंडिज विरोधात मात्र चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

शेवटच्या एकदिवसीय मालिकेत रोहितकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित सातव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात युवराजचा एक रेकॉर्ड मोडण्याची रोहितकडे संधी आहे.

रोहितनं 217 सामन्यात 210 डावांमध्ये 8676 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये रोहित सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळं युवराजला मागे टाकण्यासाठी रोहितला केवळ 26 धावांची गरज आहे.

सिक्सर किंग युवराज सिंगच्या नावावर 304 एकदिवसीय सामन्यात 8701 धावा आहेत. काही महिन्यांआधी युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

रोहित शर्माच्या आधी या लिस्टमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, मोहम्मद अजहरुद्दीन आणि युवराज सिंग आहेत.

Loading...

भारतानं वेस्ट इंडीज विरुद्धची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये अखेरचा सामना होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...