IND vs WI 3rd ODI : विराटसेना एकदिवसीय मालिकाही जिंकणार? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

भारताने टी20 मालिका 3-0 ने जिंकली असून एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 08:45 AM IST

IND vs WI 3rd ODI : विराटसेना एकदिवसीय मालिकाही जिंकणार? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

त्रिनिदाद, 14 ऑगस्ट : भारतानं वेस्ट इंडीज विरुद्धची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये अखेरचा सामना होणार आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. त्यामुळं आता शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताचे मालिका विजयाचं लक्ष्य असेल.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरचं अर्धशतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 59 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. बुधवारी त्रिनिदाद इथं होणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता खेळवण्यात येणार आहे.

भारतासाठी शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय भारताची मधल्या फळीत चौथ्या क्रमांकाची डोकेदुखी अद्याप कायम आहे. ऋषभ पंतला या क्रमांकावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यरने मात्र पाचव्या क्रमांकावर अर्धशतक करून मधल्या फळीत आपली दावेदारी पक्की करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.

वेस्ट इंडीजसाठी एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तसेच तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. त्यामुळं वेस्ट इंडीजचा संघ गेलला विजयी निरोप देण्यासाठी मैदानात उतरेल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा अखेरचा सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे.

Loading...

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर (कर्णधार) केमार रोच.

VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 08:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...