India vs West Indies 2nd Test : वेस्ट इंडिजचा सुपडासाफ, भारताकडे 299 धावांची आघाडी

India vs West Indies 2nd Test : वेस्ट इंडिजचा सुपडासाफ, भारताकडे 299 धावांची आघाडी

तिसऱ्या दिवशी विंडिजचा संपूर्ण संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला.

  • Share this:

जमैका, 01 सप्टेंबर : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवशी बुमराहच्या हॅट्ट्रीकनं खिंडार पाडलेल्या विंडिजच्या फलंदाजीला शमी आणि इशांत शर्मानं नेस्तनाबूद केले. तिसऱ्या दिवशी विंडिजचा संपूर्ण संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला. हनुमा विहारीच्या शतकानंतर बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. भारताकडे सध्या 299 धावांची आघाडी आहे.

तिसऱ्या दिवशीच्या खेळ 7 बाद 87वरून पुढे गेला असता तिसऱ्या दिवशी पहिल्या षटकात विंडिजला 8वा धक्का बसला. कार्नवॉल 14 धावा करत बाद झाला. तर हॅमिल्टन 5 धावा करत बाद झाला. तिसऱ्या दिवशी विंडिजला केवळ 30 धावा करता आल्या. त्यामुळं भारताकडे मोठी आघाडी आहे. भारताकडून बुमराहनं 6, शमीने 2 तर, इशांत शर्मानं एक विकेट घेतली.

Loading...

वाचा-विराट आता तरी झोपेतून उठ! 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी डोकेदुखी

भारतानं पहिल्या डावात 416 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजीला बुमराहनं खिंडार पाडलं. त्यानं 9.1 षटकांत फक्त 16 धावा देत 6 फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्यासमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. बुमराहशिवाय मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. त्याने 8 षटकांत 19 धावा दिल्या. विंडीजचा सलामीवीर ब्रेथवेट 10 धावा, हेटमायर, 34 धावा तर कर्णधार जेसन होल्डर 18 धावा करू शकले. यांच्याशिवाय इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

तत्पूर्वी, भारतानं पहिल्या डावात हनुमा विहारीचं शतक, विराट कोहली आणि इशांत शर्मा, मयंक अग्रवाल यांच्या शतकाच्या जोरावर 416 धावा केल्या.

हनुमा विहारीने 111 धावा केल्या. विराट कोहली 76 धावा, इशांत शर्मा 57 तर मयंक अग्रवालनं 55 धावा केल्या. जेसन होल्डरनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. रहकीम कार्नवॉलनं 3 तर केमार रोच आणि कार्लोस ब्रेथवेटनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

वाचा-शतक केल्यानंतर भावुक झाला हनुमा विहारी, कारण होतं 12 वर्षांपूर्वीच दु:ख!

असे मिळाले दोन विकेट

भारतानं दिलेल्या 416 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या डावात बुमराहनं 9व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर बुमराहला विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्राव्होला राहुलच्या हाती झेल देत बाद केले. तर तिसऱ्या चेंडूवर ब्रुक्सला एलबीडब्लू करत बाद केले. चौथा चेंडू बुमराहसाठी हॅट्ट्रिक चेंडू होता.

बुमरहाच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो होता विराट

चौथा चेंडू रोस्टन चेजच्या पायाला लागला. मात्र अम्पायरनं नाबाद दिले, बुमराहनेही जोरात अपील केले नाही. त्याला वाटले हा चेंडू बॅटवर लागला आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीच्या डोक्यात वेगळेच विचार होता. त्यानं डीआरएस घेण्याची मागणी केली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेजला बाद घोषित केले.

वाचा-91 कसोटी सामने, 125 डावांनंतर राखली इशांत शर्मानं लाज!

Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...