जमैका, 28 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 30 ऑगस्टपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, पहिल्या कसोटी मालिकेत भारतीय संघानं 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतानं 318 धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत करत विजय मिळवला. याआधी भारतीय संघानं टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला खरच्या मैदानावर क्लिन स्विप दिली होती. त्यामुळं कसोटी मालिकाही आपल्या खिशात घालण्यास विराटसेना सज्ज आहे.
दरम्यान भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. भारतीय संघानं आतापर्यंत एकदाही टी-20, एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटीमध्ये वेस्ट इंडिजवर मालिका विजय मिळवलेला नाही. त्यामुळं दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासह भारतीय संघ हा विक्रमही मोडू शकतो.
कोहली मोडणार धोनीचा सर्वात मोठा विक्रम
दरम्यान, कर्णधार विराट कोहलीही दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत एक विक्रम आपल्या नावावर करून घेणार आहे. सध्या विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांनी 27-27 कसोटी सामने कर्णधार म्हणून जिंकले आहेत. त्यामुळं दुसऱ्या कसोटी सामन्या विजय मिळवत कोहली 28 विजयांसह धोनीला मागे टाकू शकतो. धोनीनं 60 सामन्यात 27 विजय मिळवले आहेत. तर, कोहलीनं ही कामगिरी केवळ 47 सामन्यात केली आहे.
वाचा-वडिलांनी जिंकून दिले कारगिल युध्द, मुलगा धोनी स्टाईलनं क्रिकेट कप जिंकण्यास सज्ज
याआधी कोहलीनं गांगुलीला टाकले आहे मागे
याआधी कोहलीनं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं भारता बाहेर 12 कसोटी सामने जिंकले आहेत. यात कोहलीनं गांगुलीला मागे टाकले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं केवळ 6 सामने भारताबाहेर जिंकले होते.
भारत-वेस्ट इंडिज सामन्याची वेळ बदलणार
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरू झाला होता. मात्र दुसरा कसोटी सामना 8 वाजता सुरू होणार आहे. जमैकाच्या किंगस्टन येथील मैदानावर या मालिकेतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ 2-0नं ही मालिका जिंकण्यास सज्ज आहे.
वाचा-ऋषभ पंतवरचा विश्वास उडाला, टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियानं सुरू केली शोधाशोध!
येथे पाहू शकता सामना लाईव्ह
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अँटिगुआ येथे होणारा पहिला कसोटी सामना सोनी टेन आणि सोनी टेन 3वर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय Soni HDवरही सामना पाहू शकता.
टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 120 गुण मिळवण्यास भारतीय संघ सज्ज
पहिल्या कसोटी सामन्यात 318 धावांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, दुसरा सामना जिंकल्यास भारतीय संघाचे 120 गुण होतील. भारतीय खेळाडूंचा फॉर्म पाहता दुसरा सामना जिंकणे कठिण जाणार नाही.
वाचा-दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा, पण झाला आहे एक बदल!
VIDEO: लालबागमध्ये राम मंदिराचा देखावा, पाहा EXCULSIVE दृश्यं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा