India vs West Indies 2nd Test : इशांतचा कव्हर ड्राईव्ह पाहून विराटला बसला शॉक, VIDEO VIRAL

India vs West Indies 2nd Test : इशांतचा कव्हर ड्राईव्ह पाहून विराटला बसला शॉक, VIDEO VIRAL

इशांत शर्माच्या अर्धशतकी खेळीनंतर विराट कोहलीनं ड्रेसिंग रूममधून एकदम हटके अंदाजात त्याचे कौतुक केले.

  • Share this:

जमैका, 01 सप्टेंबर : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. यात गोलंदाज इशांत शर्माचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र या सामन्यात इशांतनं गोलंदाज म्हणून नाही तर फलंदाजीनं योगदान दिले. दुसऱ्या कसोटी सामन्यात इशांत शर्मानं वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना हैरान केले. या सामन्यात हनुमा विहारीसोबत 9व्या विकेटसाठी इशांत शर्मानं 112 धावांची शतकी भागिदारी केली. याचबरोबर आपले अर्धशतकही पूर्ण केले. दरम्यान इशांत शर्माच्या अर्धशतकी खेळीनंतर विराट कोहलीनं ड्रेसिंग रूममधून एकदम हटके अंदाजात त्याचे कौतुक केले.

दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंतची विकेट गमावली. त्यानंतर मात्र जडेजाच्या विकेटनंतर इशांत शर्मा मैदानावर आला. त्यानं हनुमा विहारीला चांगली साथ देत भारताला 416 धावांचा डोंगर उभा करुन दिला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजीला बुमराहनं खिंडार पाडलं. त्यानं 9.1 षटकांत फक्त 16 धावा देत 6 फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्यासमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. बुमराहशिवाय मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. त्याने 8 षटकांत 19 धावा दिल्या. विंडीजचा सलामीवीर ब्रेथवेट 10 धावा, हेटमायर, 34 धावा तर कर्णधार जेसन होल्डर 18 धावा करू शकले. यांच्याशिवाय इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

वाचा-India vs West Indies 2nd Test : शतक केल्यानंतर भावूक झाला हनुमा विहारी, कारण होतं 12 वर्षांपूर्वीचं दु:ख!

दरम्यान इशांत शर्मा मैदानात उतरण्यापूर्वी विराट कोहली त्याला काही टिप्स देत होता. जडेजा आणि विहारी खेळत असताना ड्रेसिंग रूममध्ये विराट इशांत शर्माला फलंदाजीच्या टिप्स देत होता. त्यावेळी विराटलाही अंदाजा नव्हता की इशांत शर्मा इतकी चांगली फलंदाजी करू शकतो. जडेजा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या इशांत शर्मानं विहारी सोबत शतकी भागिदारी केली. त्याचबरोबर एक कव्हर ड्राईव्हही लगावला. यावर ड्रेसिंग रूममध्ये बसलेला कोहली भलताच खुश झाला. इशांतनं 80 चेंडूत 57 धावा केल्या, यात सात चौकारांचा समावेश होता.

वाचा-बुमराहच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो ठरला विराट! एका निर्णयानं घडला इतिहास

विहारीनं केले इशांत शर्माचे कौतुक

कसोटी क्रिकेटमध्ये पहिली शतकी खेळी करणाऱ्या विहारीनं सामन्यानंतर इशांत शर्माचे कौतुक केले. “माझ्या पहिल्या शतकी खेळीमुळं मी खुश आहे. पण त्याचे खरे श्रेय इशांत शर्माला जाते. एक फलंदाज म्हणून त्यानं माझ्याहून चांगली कामगिरी केली. ज्याप्रमाणे इशांत शर्मा खेळत होता, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आम्ही सतत गोलंदाजाच्या डोक्यात काय चालू असावे, याबाबत चर्चा करत होतो. त्याचा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला”, असे मत विहारीनं व्यक्त केले.

वाचा-IND vs WI इतिहास रचण्यापूर्वी बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम!

VIDEO: महिला बस चालकाचा इंगा! मुलींना छेडणाऱ्याला फिल्मी स्टाईलनं मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या