India vs West Indies 2nd Test : सामन्यादरम्यान मैदानातच कोसळला दिग्गज फलंदाज!

India vs West Indies 2nd Test : सामन्यादरम्यान मैदानातच कोसळला दिग्गज फलंदाज!

रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर विव पुन्हा मैदानात परतले.

  • Share this:

जमैका, 31 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला 30 ऑगस्टला सुरुवात झाली. मात्र या सामन्याआधीच वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज विव रीचर्ड्स मैदानावरचं कोसळले आणि सर्वांना आश्वर्याचा धक्का बसला. रीचर्ड्स यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. सामन्यासाठी समालोचन करत असताना अचानक रीचर्ड्स मैदानावर कोसळले त्यामुळं त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन जावे लागले. दरम्यान रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर विव पुन्हा मैदानात परतले.

67 वर्षीय रीचर्ड्स यांनी समालोचन करत असतानाच आपण ठीक असल्याचे सांगितले. तसेच, “जगातला कोणताही गोलंदाज मला असं पाडू शकला नाही मात्र एका आजारामुळं मला मैदानावर पडावे लागले”, असे म्हणत दु:ख व्यक्त केले.

वाचा-INDvsWI : पंत-विहारी यांनी सावरला डाव, भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा

शरीरात पाण्याची कमी झाल्यामुळं झाला होता त्रास

जमैकामधील प्रचंड गर्मीचा त्रास रीचर्ड्स यांना झाला. त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळं त्यांना हा त्रास झाला. कॅरेबियन फलंदाज भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात समालोचन करत होते. मात्र अचानक त्यांना त्रास झाला आणि मैदान सोडावे लागले. मात्र त्यांनी उपचार घेतल्यानंतर पुन्हा समालोचन करण्यात सुरुवात केली. या दिग्गज फलंदाजानं वेस्ट इंडिजसाठी 121 कसोटी सामने आणि 187 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात जवळजवळ 15 हजारांच्या वर धावा केल्या आहेत. 1991मध्ये रीचर्ड्स यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

वाचा-VIDEO : भारतीय मुलांचा भन्नाट स्टंट, पाचवेळा ऑलिम्पिक विजेतीसुद्धा झाली चाहती

विंडिजला क्लिन स्विप देण्यासाठी भारतीय संघ सज्ज

टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष कसोटी मालिकेकडे आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतानं 1-0नं आघाडी घेतली आहे. याचबरोबर टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 60 गुणांची कमाई केली आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाच्या 32 धावा झाल्या असताना भारताला पहिला धक्का बसला. केएल राहुल 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मयंक अग्रवाल यांनी 69 धावांची भागिदारी करून डाव सावरला. भारताच्या 115 धावा झाल्या असताना मयंक अग्रवाल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे 24 धावा करून बाद झाला. रहाणे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी 76 धावांची भागिदारी करून संघाची धावसंख्या 200 च्या पार पोहचवली. त्यानंतर पंत आणि विहारी यांनी डाव सावरला. दिवसाअखेरीस भारतानं 5 बाद 264 धावा केल्या.

वाचा-जिचा जन्म झाला नव्हता तेव्हा जिंकलं होतं ग्रॅण्डस्लॅम, तिनेच सेरेनाला शिकवले धडे

गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 4:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading