India vs West Indies : फ्लॉप राहुल चालतो मग रोहित का नाही? चाहत्यांचा विराटवर संताप

India vs West Indies : फ्लॉप राहुल चालतो मग रोहित का नाही? चाहत्यांचा विराटवर संताप

वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी दौऱ्यात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही.

  • Share this:

जमैका, 31 ऑगस्ट : वर्ल्ड कप 2019मध्ये रोहित शर्मानं केलेल्या तुफान कामगिरीच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 5 शतक लागवण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. या स्टार सलामी फलंदाजानं वर्ल्ड कपमध्ये 81च्या सरासरीनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे 648 धावा केल्या. मात्र तरी, वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी दौऱ्यात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं चाहते विराट कोहलीवर भडकले आहे.

विराट कोहलीच्या कसोटी संघात रोहितला मधल्या फळीत किंवा सलामीला सुध्दा जागा मिळालेली नाही. तर, संघात हनुमा विहारी, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. सध्या सलामीला येत असलेल्या राहुलनं गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये शेवटचे शतक ठोकले होते. त्यानंतर 11 डावांमध्ये त्यानं निराशाजनक कामगिरी केली आहे. राहुलला एक अर्धशतकही करता आलेले नाही. त्यामुळं रोहितला एकही संधी नाही आणि राहुलला एवढ्या संधी का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

इंग्लड दौऱ्यानंतर भारतीय संघानं तब्बल 10 कसोटी सामने खेळले. यातील 7 सामन्यात राहुलला संघात स्थान देण्यात आले. मात्र ओव्हलमध्ये केलेली 149 धावांची शतकी खेळी वगळता, राहुलला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान इतर कसोटी मालिकांमध्येही राहुलला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.

वाचा-INDvsWI : पंत-विहारी यांनी सावरला डाव, भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा

वेस्ट इंडिज विरोधात राहुलचा फ्लॉप शो

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात राहुलनं 3 डावांमध्ये 44, 38 आणि 13 धावा केल्या. मात्र तरी, कसोटी सामन्यात तरी, राहुलला संधी देण्यात येते. त्यामुळं चाहत्यांनी रोहितला संघात जागा का नाही असा सवाल केला आहे.

गांगुलीनं व्यक्त केले होते आश्चर्य

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जाहीर केल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यांच्यामते रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फॉर्मला कसोटी क्रिकेटमध्येही वापरले पाहिजे. मधल्या फळीत रोहित योग्य प्रकारे फलंदाजी करू शकतो, असे मत व्यक्त केले होते. मात्र दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला संघात जागा दिलेली नाही.

वाचा-आफ्रिका दौऱ्यासाठी 6 दिवसआधीच झाली टीम इंडियाची निवड! 'हे' आहे कारण

विंडिजला क्लिन स्विप देण्यासाठी भारतीय संघ सज्ज

टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष कसोटी मालिकेकडे आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतानं 1-0नं आघाडी घेतली आहे. याचबरोबर टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 60 गुणांची कमाई केली आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाच्या 32 धावा झाल्या असताना भारताला पहिला धक्का बसला. केएल राहुल 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मयंक अग्रवाल यांनी 69 धावांची भागिदारी करून डाव सावरला. भारताच्या 115 धावा झाल्या असताना मयंक अग्रवाल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे 24 धावा करून बाद झाला. रहाणे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी 76 धावांची भागिदारी करून संघाची धावसंख्या 200 च्या पार पोहचवली. त्यानंतर पंत आणि विहारी यांनी डाव सावरला. दिवसाअखेरीस भारतानं 5 बाद 264 धावा केल्या.

वाचा-VIDEO : भारतीय मुलांचा भन्नाट स्टंट, पाचवेळा ऑलिम्पिक विजेतीसुद्धा झाली चाहती

गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 5:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading