जमैका, 02 सप्टेंबर : जमैकामध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, विराट कोहली एवढेच नाही तर इशांत शर्मानेही आपली फलंदाजीची झलक दाखवली. मात्र भारतीय संघातील एक खेळाडू चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुलनं दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही निराशजन कामगिरी केली. राहुल केवळ 66 चेंडू खेळल्यानंतर केवळ 6 धावा करत बाद झाला. त्यामुळं पुन्हा राहुलवर टीका करण्यात येत आहे. याआधी पहिल्या डावातं राहुलनं 13 धावा केल्या होत्या. त्यामुळं इशांत शर्मा राहुलपेक्षा चांगला सलामीवीर आहे, अशी टीका ट्विटरवरून केली जात आहे.
तर, दुसरीकडे पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी झाल्यानंतरही राहुलला संघात जागा का मिळाली, असा सवालही चाहते विचारत आहेत. वर्ल्ड कप 2019मध्ये रोहित शर्मानं केलेल्या तुफान कामगिरीच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 5 शतक लागवण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. या स्टार सलामी फलंदाजानं वर्ल्ड कपमध्ये 81च्या सरासरीनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे 648 धावा केल्या. मात्र तरी, वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी दौऱ्यात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं चाहते विराट कोहलीवर भडकले आहे.
वर्ल्ड कप 2019मध्ये रोहित शर्मानं केलेल्या तुफान कामगिरीच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 5 शतक लागवण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. या स्टार सलामी फलंदाजानं वर्ल्ड कपमध्ये 81च्या सरासरीनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे 648 धावा केल्या. मात्र तरी, वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी दौऱ्यात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं चाहत्यांनी इशांत शर्माला सलामीला फलंदाजीसाठी पाठवा अशी मागणी केली आहे.
वाचा-विराट आता तरी झोपेतून उठ! 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी डोकेदुखी
Loading...Ishant Sharma is better than KL Rahul..
— Parivesh - Universal Brother ❤️ (@Parivesh95) September 1, 2019
KL Rahul 6(63)
Can't we have Ishant As Our Test Opener?@BCCI I bet he will score more. #INDvWI
— ANSH (@Ansh_MSDian) September 1, 2019
KL Rahul spends more time being half naked in beaches and swimming pools than on the crease in Team India's jersey. #WIvIND
— Sri Gochi Guruji (@SriGochiGuruji) September 1, 2019
6 off 62 balls. Hey Rahul, I know how that feels 🙈 hang in there... #WIvIND
— Aakash Chopra (@cricketaakash) September 1, 2019
विराट कोहलीच्या कसोटी संघात रोहितला मधल्या फळीत किंवा सलामीला सुध्दा जागा मिळालेली नाही. तर, संघात हनुमा विहारी, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. सध्या सलामीला येत असलेल्या राहुलनं गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये शेवटचे शतक ठोकले होते. त्यानंतर 11 डावांमध्ये त्यानं निराशाजनक कामगिरी केली आहे. राहुलला एक अर्धशतकही करता आलेले नाही. त्यामुळं रोहितला एकही संधी नाही आणि राहुलला एवढ्या संधी का, असा सवाल चाहते विचारत आहेत.
वाचा-विंडीज दौरा संपताना विराटच्या कामगिरीवर पडला डाग!
एका वर्षात राहुलची निराशाजनक खेळी
गेल्या वर्षभरात केएल राहुलनं कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. तब्बल 11 डावांआधी राहुलनं अर्धशतकी खेळी केली होती. राहुलनं ऑक्टोबर 2018मध्ये इंग्लंडमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर आजपर्यंत त्याला एकदाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लड दौऱ्यानंतर भारतीय संघानं तब्बल 10 कसोटी सामने खेळले. यातील 7 सामन्यात राहुलला संघात स्थान देण्यात आले. मात्र ओव्हलमध्ये केलेली 149 धावांची शतकी खेळी वगळता, राहुलला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान इतर कसोटी मालिकांमध्येही राहुलला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.
वेस्ट इंडिज विरोधात राहुलचा फ्लॉप शो
वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात राहुलनं 3 डावांमध्ये 44, 38 आणि 13 धावा केल्या. मात्र तरी, कसोटी सामन्यात तरी, राहुलला संधी देण्यात येते. त्यामुळं चाहत्यांनी रोहितला संघात जागा का नाही असा सवाल केला आहे.
वाचा-पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टशी बरोबरी!
गांगुलीनं व्यक्त केले होते आश्चर्य
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जाहीर केल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यांच्यामते रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फॉर्मला कसोटी क्रिकेटमध्येही वापरले पाहिजे. मधल्या फळीत रोहित योग्य प्रकारे फलंदाजी करू शकतो, असे मत व्यक्त केले होते. मात्र दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला संघात जागा दिलेली नाही.
वाचा-पहिल्या सामन्याआधी अचानक डावललं, धोनीच्या नेतृत्वाखाली बदललं नशीब
पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा