India vs West Indies 2nd Test : 91 कसोटी सामने, 125 डावांनंतर राखली इशांत शर्मानं लाज!

इशांत शर्मानं हनुमा विहारीसोबत या सामन्यात 9व्या विकेटसाठी 112 धावांची शतकी भागिदारी केली.

  • Share this:

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीमध्ये हनुमा विहारीनं तर, गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहनं कमाल केली. त्यामुळं या सामन्यात भारताचे पारडे जड आहे.

मात्र, या सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती इशांत शर्माची. आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इशांतनं या सामन्यात फलंदाजी करत कमाल केली.

या सामन्यात हनुमा विहारीसोबत 9व्या विकेटसाठी इशांत शर्मानं 112 धावांची शतकी भागिदारी केली.

शतकी भागिदारीसोबत इशांत शर्मानं आपले अर्धशतक पूर्ण केले. हे इशांत शर्माचे पहिले अर्धशतक होते. इशांतनं 80 चेंडूत 57 धावा केल्या, यात सात चौकारांचा समावेश होता.

2007मध्ये बांगलादेश विरोधात पदार्पण करणाऱ्या इशांतनं तब्बल 91 सामने आणि 125 डावांनंतर अर्धशतकी खेळी केली.

याचबरोबर इशांतनं एका खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सगळ्यात जास्त कसोटी डावांत अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इशांत दुसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अंडरसन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं 130 डावांनंतर पहिले अर्धशतक लगावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या