India vs West Indies 2nd Test Match : दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला पंत, VIDEO पाहून तुम्ही लावाल डोक्याला हात!

दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंत बोल्ड झाला. त्यामुळे पुन्हा त्याचा खेळीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 09:45 PM IST

India vs West Indies 2nd Test Match : दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला पंत, VIDEO पाहून तुम्ही लावाल डोक्याला हात!

जमैका, 31 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं चांगली सुरुवात करत पहिल्या दिवशी 264 धावा केल्या. तेव्हा मैदानात हनुमा विहारी आणि ऋषभ पंत होते. मात्र दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंत बोल्ड झाला. त्यामुळे पुन्हा त्याचा खेळीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. संघाला गरज असताना पंत 27 धावा करत बाद झाला. जेसन होल्डरनं पंतला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले.

जेसन होल्डरचा चेंडू पंतला खेळताचा आला नाही, आणि तो बोल्ड झाला. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यात पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. पंतनं पहिल्या कसोटी सामन्यातही 24 आणि 7 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळं पंतच्या खेळीवरून त्याच्यावर टीका केली जात आहे. पंतसाठी वेस्ट इंडिज दौरा काहीसा असफल राहिला आहे. टी-20 मालिकेच्या अंतिम सामन्यात केवळ पंतनं 65 धावा केल्या होत्या. बाकी सामन्यात त्याला 30चा आकडाही पार करता आला नाही. टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात पंतला खातेही उघडता आले नाही. तर, दुसऱ्या सामन्यात केवळ 4 धावा करत तो बाद झाला. तर, एकदिवसीय सामन्यातही पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं पंतचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.

Loading...

वाचा-‘हातात ग्लोव्हज घालून विकेटकिपर होत नाही’, माजी खेळाडूची ऋषभ पंतवर जहरी टीका

विंडिजला क्लिन स्विप देण्यासाठी भारतीय संघ सज्ज

टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष कसोटी मालिकेकडे आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतानं 1-0नं आघाडी घेतली आहे. याचबरोबर टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 60 गुणांची कमाई केली आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाच्या 32 धावा झाल्या असताना भारताला पहिला धक्का बसला. केएल राहुल 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मयंक अग्रवाल यांनी 69 धावांची भागिदारी करून डाव सावरला. भारताच्या 115 धावा झाल्या असताना मयंक अग्रवाल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे 24 धावा करून बाद झाला. रहाणे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी 76 धावांची भागिदारी करून संघाची धावसंख्या 200च्या पार पोहचवली. विहारीनं आपले अर्धशतक पूर्ण केले.

वाचा-दिग्गज गोलंदाज अडकला SEX रॅकेटमध्ये, गर्लफ्रेंड आणि इतर महिलांसोबत घातला धिंगाणा

ऋषभ पंतच्या शॉटवर उपस्थित झाले अनेक प्रश्न

अलिकडच्या काळात ऋषभ पंतच्या शॉट निवडीवर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरी असो वा वेस्ट इंडीज विरूद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिका असो, पंतने अत्यंत खराब फटका मारून विकेट गमावली. सेहवाग याच गोष्टीला त्याची कमकूवत बाजू मानतो. पंत सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध एक कसोटी मालिका खेळत आहे जिथे त्याला अँटिगा कसोटीत स्वत: ला सिद्ध करण्याची संधी आहे. तसेट, त्याने कसोटी फलंदाज म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके केली आहेत आणि म्हणूनच त्याला ऋद्धिमान साहापेक्षा प्राधान्य दिले जाते.

वाचा-फ्लॉप राहुल चालतो मग रोहित का नाही? चाहत्यांचा विराटवर संताप

मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...