India vs West Indies 2nd Test : विराट आता तरी झोपेतून उठ! 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी डोकेदुखी

भारतीय संघातील एक खेळाडू सध्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 08:07 PM IST

India vs West Indies 2nd Test : विराट आता तरी झोपेतून उठ! 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी डोकेदुखी

जमैका, 01 सप्टेंबर : जमैकामध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, विराट कोहली एवढेच नाही तर इशांत शर्मानेही आपली फलंदाजीची झलक दाखवली. मात्र भारतीय संघातील एक खेळाडू चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळं टीम इंडियासाठी हा खेळाडू अडगळीचा झाला आहे. या खेळाडूचे नाव आहे केएल राहुल. कसोटी सामन्यात सलामीला आलेल्या आलेल्या राहुलला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं रोहित शर्माला संधी का दिली नाही, असा सवाल चाहते विचारत आहेत.

वर्ल्ड कप 2019मध्ये रोहित शर्मानं केलेल्या तुफान कामगिरीच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 5 शतक लागवण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. या स्टार सलामी फलंदाजानं वर्ल्ड कपमध्ये 81च्या सरासरीनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे 648 धावा केल्या. मात्र तरी, वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी दौऱ्यात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं चाहते विराट कोहलीवर भडकले आहे.

विराट कोहलीच्या कसोटी संघात रोहितला मधल्या फळीत किंवा सलामीला सुध्दा जागा मिळालेली नाही. तर, संघात हनुमा विहारी, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. सध्या सलामीला येत असलेल्या राहुलनं गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये शेवटचे शतक ठोकले होते. त्यानंतर 11 डावांमध्ये त्यानं निराशाजनक कामगिरी केली आहे. राहुलला एक अर्धशतकही करता आलेले नाही. त्यामुळं रोहितला एकही संधी नाही आणि राहुलला एवढ्या संधी का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

वाचा-91 कसोटी सामने, 125 डावांनंतर राखली इशांत शर्मानं लाज!

एका वर्षात राहुलची निराशाजनक खेळी

Loading...

गेल्या वर्षभरात केएल राहुलनं कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. तब्बल 11 डावांआधी राहुलनं अर्धशतकी खेळी केली होती. राहुलनं ऑक्टोबर 2018मध्ये इंग्लंडमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर आजपर्यंत त्याला एकदाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लड दौऱ्यानंतर भारतीय संघानं तब्बल 10 कसोटी सामने खेळले. यातील 7 सामन्यात राहुलला संघात स्थान देण्यात आले. मात्र ओव्हलमध्ये केलेली 149 धावांची शतकी खेळी वगळता, राहुलला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान इतर कसोटी मालिकांमध्येही राहुलला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.

वाचा-शतक केल्यानंतर भावुक झाला हनुमा विहारी, कारण होतं 12 वर्षांपूर्वीच दु:ख!

वेस्ट इंडिज विरोधात राहुलचा फ्लॉप शो

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात राहुलनं 3 डावांमध्ये 44, 38 आणि 13 धावा केल्या. मात्र तरी, कसोटी सामन्यात तरी, राहुलला संधी देण्यात येते. त्यामुळं चाहत्यांनी रोहितला संघात जागा का नाही असा सवाल केला आहे.

गांगुलीनं व्यक्त केले होते आश्चर्य

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जाहीर केल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यांच्यामते रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फॉर्मला कसोटी क्रिकेटमध्येही वापरले पाहिजे. मधल्या फळीत रोहित योग्य प्रकारे फलंदाजी करू शकतो, असे मत व्यक्त केले होते. मात्र दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला संघात जागा दिलेली नाही.

वाचा-फ्लॉप राहुल चालतो मग रोहित का नाही? चाहत्यांचा विराटवर संताप

Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...