India vs West Indies 2nd Test : वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी, भारतीय संघाला आहे धोका!

India vs West Indies 2nd Test : वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी, भारतीय संघाला आहे धोका!

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे पारडे जड आहे.

  • Share this:

जमैका, 02 सप्टेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे पारडे जड आहे. तिसऱ्या दिवशीचा खेल संपला तेव्हा वेस्ट इंडिजनं 45 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी 423 धावांची गरज आहे. सध्या वेस्ट इंडिज संघाची परिस्थिती पाहता टीम इंडिया सामना जिंकण्यास सज्ज आहे. याआधी भारतीय संघानं टी-20, एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली होती. त्यामुळं आता वेस्ट इंडिजला कसोटी सामन्यात त्यांच्या घरात नमवत ही मालिकाही जिंकण्यास सज्ज आहे. मात्र, अजूनही हा सामना अनिर्णीत होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे वेस्ट इंडिजमधले वातावरण.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 4 बाद 168 धावा केल्या. त्यापूर्वी विंडीजचा पहिला डाव 117 धावांत आटोपला. भारतानं पहिला डाव घोषित करून विंडीजला 468 धावांचे आव्हान दिलं आहे. तिसऱ्या दिवशी या आव्हानाचा पाठलाग करताना दिवसअखेर विंडीजच्या दोन बाद 45 धावा झाल्या. ब्राव्हो 18 धावांवर तर ब्रूक्स 4 धावांवर खेळत आहे. मात्र दोन्ही संघांना सध्या एक वेगळाच धोका सतावत आहे.

वाचा-राहुलने लाज काढली, नेटीझन्स म्हणाले याच्यापेक्षा इशांत शर्मा बरा!

भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. चेतेश्वर पुजारा 27 धावांवर बाद झाला. तर कर्णधार विराट कोहलीला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर रहाणेनं नाबाद 64 आणि हनुमा विहारीनं नाबाद 53 धावांची खेळी केली. 4 बाद 167 धावांवर भारतानं डाव घोषित केला. विंडिजच्या केमार रोचनं 28 धावांत तीन गडी बाद केले.

वाचा-विहारीनं केली सचिनसारखी अनोखी कामगिरी, 29 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं झालं!

290 किमी प्रति तासाच्या वेगानं धोका

वेस्ट इंडिजची फलंदाजी कमकुवत असल्यामुळं भारतीय संघ चौथ्या दिवशी सामना जिंकू शकते. मात्र एक धोका भारतीय संघाला सतावत आहे. जमैकाच्या हवामना विभागानं दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या आणि पाचव्या दिवशी वादळासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार डोरियन नावाचे चक्रिवादळ 290 किमी प्रति तासाच्या वेगानं जमैकामध्ये धडकणार आहे. त्यामुळं पावासाबरोबर वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाचा-विंडीज दौरा संपताना विराटच्या कामगिरीवर पडला डाग!

फॉलोऑन मिळाले तर तिसऱ्या दिवशीच मिळणार संघाला विजय

टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरोधात पहिल्या डावात 117 धावांवर ऑल आऊट झाला. त्यामुळं भारताला 299 धावांची आघाडी आहे. त्यामुळं कर्णधार विराट कोहलीकडे विंडिज संघाला फॉलोऑन देण्याची एक संधी आहे. त्यामुळं फॉलोऑन मिळाल्यास भारताचा विजय निश्चित मानला जाऊ शकतो. मात्र दोन्ही दिवसात पाऊस पडला तर सामन्यांचे चित्र वेगळे असेल.

वाचा-पहिल्या सामन्याआधी अचानक डावललं, धोनीच्या नेतृत्वाखाली बदललं नशीब

कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या