IND vs WI : फक्त 19 धावा करत कॅप्टन कोहलीनं रोहितकडून हिसकावले सिंहासन!

IND vs WI : फक्त 19 धावा करत कॅप्टन कोहलीनं रोहितकडून हिसकावले सिंहासन!

रोहित-विराटमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरू आहे या विक्रमासाठी लढाई.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 08 डिसेंबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या टी -20 सामन्यात विश्वविक्रम नोंदविला आहे. विराट कोहलीनं रोहित शर्माला मागे टाकत पुन्हा एकदा आपले सिंहासन मिळवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 19 धावा करत विराट पुन्हा एकदा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहलीनं दुसऱ्या टी -20 सामन्यात कोणताही मोठी खेळी केली नाही. असे असूनही, त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 17 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 19 धावा फटकावल्या. यासह त्याने टी -20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहितला मागे टाकले.

वाचा-VIDEO : प्रेक्षकांनी केला जयघोष, तर भरमैदानात रवी शास्त्रींनी संजूवर उचलला हात

दरम्यान भारतानं दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत विडिंजना 171 धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या 94 धावांच्या आतषबाजीमुळे भारतानं हा सामना 6 विकेटनं जिंकला होता. हा सामना जिंकल्यास भारत ही टी-20 मालिका खिशात घालेल.

वाचा-शिवम दुबे आणि पंतने टीम इंडियाला सावरलं! विंडिजला 171 धावांचे आव्हान

 

वाचा-VIDEO : ‘माझ्या बहिणीसोबत झोपला खेळाडू’, कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

रोहित-विराटमध्ये लढाई सुरू

गेल्या वर्षभरात टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम या दोन फलंदाजांभोवती फिरत आहे. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा रोहित शर्माला अवघ्या एका धावांनी मागे टाकले. विराट कोहलीने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2563 धावा केल्या आहेत. त्याचवेळी रोहित शर्माने या सामन्यात 2562 धावा केल्या. त्यामुळं पुढच्या सामन्यात रोहितकडे संधी विराटला मागे टाकण्याची संधी असणार आहे.

T20मध्य सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू

2563 - विराट कोहली

2562 - रोहित शर्मा

2436 - मार्टिन गुप्टिल

2263 - शोएब मलिक

वाचा-संघाची लाजीरवाणी कामगिरी! 10 फलंदाज शून्यावर बाद, गोलंदाजांसमोर दाणादाण

विराट कोहलीची शानदार कारकीर्द

विराट कोहली हा टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 23 वेळा अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्मा या विक्रमात दुसर्‍या क्रमांकावर असून टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 22वेळा अशी कामगिरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या