India vs West Indies : दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया करणार रेकॉर्डब्रेक कामगिरी! रचले जाणार 6 विक्रम

India vs West Indies : दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया करणार रेकॉर्डब्रेक कामगिरी! रचले जाणार 6 विक्रम

आज टीम इंडियाचे हे शिलेदार रचणार 6 विक्रम.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 08 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियानं विजयी सुरुवात केली. पहिला टी-20 सामना विराटच्या 94 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं जिंकला. त्यामुळं तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0ने आघाडी मिळवली आहे. आता दुसरा सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला संघात जागा मिळू शकते. दुसरीकडे पहिल्या टी-20 सामन्यात ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे 4 कॅच सोडण्यात आल्या. यात गोलंदाजांनाही विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय खेळाडूंकडे पाच विक्रमक करण्याची संधी असणार आहे.

वाचा-‘मैदानात धोनी...धोनी ओरडू नका’, या कारणामुळे कॅप्टन कोहलीनं दर्शकांना केली विनंती

1.युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन दोघांनीही भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये 52 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या टी-20 सामन्यात एक विकेट घेत चहलकडे अश्विनला मागे टाकण्याची संधी असेल. त्याचबरोबर चहल 53 विकेटसह टी-20मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरेल.

2.रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 399 षटकार लगावले आहेत. त्यामुळं 1 षटकार मारल्यानंतर 400 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज होईल. त्याचबरोबर ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदीनंतर जगातील दुसरा खेळाडू ठरेल.

वाचा-टी-20 वर्ड कपसाठी टीम इंडियाचे 10 खेळाडू निश्चित! फक्त एका खेळाडूची जागा बाकी

3.केएल राहुलनं टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 46 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या टी-20 सामन्यात 4 षटकार मारल्यास एकूण 50 षटकार लगावणारा राहुल सहावा फलंदाज ठरेल.

4.भारतीय कर्णधार विराट कोहलीने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 241 चौकार लगावले आहेत. दुसऱ्या टी-20 सामन्यात विराटनं 9 चौकार लगावल्यास 250 चौकार मारणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरेल.

वाचा-VIDEO : ‘…आणि टीम इंडियानं जिंकला सामना’, राहुलनं सांगितला विराटचा मास्टरप्लॅन

5.केएल राहुलने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 92 चौकार लगावले आहेत. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 8 चौकार लगावल्यास भारतासाठी 100 चौकार लगावणारा फलंदाज होईल.

6.तसेच, भारतानं जर वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-20 सामना जिंकल्यास, भारताचा विडींजविरुद्ध ही सलग तिसरा मालिका विजय असेल.

Published by: Priyanka Gawde
First published: December 8, 2019, 7:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading