IND vs WI : टीम इंडियाची ढिसाळ कामगिरी, वेस्ट इंडिजनं 8 विकेटनं जिंकला सामना

IND vs WI : टीम इंडियाची ढिसाळ कामगिरी, वेस्ट इंडिजनं 8 विकेटनं जिंकला सामना

भारतानं दिलेले 171 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजनं सहजरित्या पार केले.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 08 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताला 8 विकेटनं हा सामना गमवावा लागला. भारतानं दिलेले 171 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजनं सहजरित्या पार केले. या सामन्यातही भारतानं मोक्याच्या क्षणी कॅच सोडल्या, त्यामुळं भारताला हा सामना गमवावा लागला. वेस्ट इंडिजकडून सिमन्सनं अर्धशतकी खेळी करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली.

भारतानं प्रथम फलंदाजी करत विंडिजला 171 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भुवनेश्वर कुमारच्या चौथ्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत यांनी कॅच सोडले. याचा फटका संघाला बसला, त्यावेळी कमी अवघ्या 10 धावांवर खेळत असलेल्या सिमन्सनं विंडीजला हा विजय मिळवून दिला. पहिल्या ओव्हरपासून भारतीय गोलंदाजांना विंडिजच्या फलंदाजांवर दबाव टाकता आला नाही. 73 धावांच्या सलामीच्या भागीदारीनंतर भारताला पहिले यश मिळाले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतल्या. तर, दीपक चाहर या सामन्यातही सर्वात महागडा गोलंदाज ठरला. चाहर आणि युजवेंद्र चहल यांनी सर्वात जास्त धावा दिल्या.

तत्पूर्वी वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शिवम दुबेच्या आक्रमक खेळीनं भारताला सावरले. शिवम दुबेच्या 54 आणि ऋषभनं 22 चेंडूत 33 धावांसह भारतानं 170पर्यंत मजल मारली. दुसऱ्या टी-20 सामना जिंकण्यासाठी विंडिजला 171 धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र हे आव्हान विडिंजनं 19व्या ओव्हरमध्ये पार केले.

वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यातही सलामीच्या फलंदाजांनी चांगली खेळी करता आली नाही. पहिल्या टी-20 सामन्यात आक्रमक खेळी करणारा केएल राहुल 11 धावा करत बाद झाला. तर, रोहित शर्मा काहीसा मैदानात उडखळताना दिसला. रोहित शर्मानं 18 चेंडूत 15 धावा केल्या, आणि होल्डेरच्या चेंडूवर बोल्ड झाला. या सामन्यात विराटच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला पाठवण्यात आले होते. सावध सुरुवात करत दुबेनं आतषबाजी करण्यास सुरुवात केली. दुबेनं आपले अर्धशतकी पूर्ण केले मात्र 30 चेंडूत 54 धावा करत तो बाद झाला. दरम्यान या सामन्यात कॅप्टन कोहलीलाही विशेष चांगली कामगिरी करता आली नाही, कोहली 19 धावा करत बाद झाला. त्यानंतर पंतने फलंदाजीची धुरा सांभाळली. मात्र शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भारताला आक्रमक फलंदाजी करता आली नाही. त्याचा फटका भारताला बसला.

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ढिसाळ कामगिरी

टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ढिसाळ कामगिरी केली. त्यामुळं सिमन्सनं मॅच विनिंग खेळी केली. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही टीम इंडियानं 3 कॅच सोडल्या. याचा फटका संघाला बसला. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकांमध्ये चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहर या सामन्यातही महागडा ठरला.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, खॅरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.

First published: December 8, 2019, 6:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading