VIDEO : प्रेक्षकांनी केला जयघोष, तर भरमैदानात रवी शास्त्रींनी संजूवर उचलला हात

VIDEO : प्रेक्षकांनी केला जयघोष, तर भरमैदानात रवी शास्त्रींनी संजूवर उचलला हात

विराटनं दिली नाही एकही संधी, तरी मैदानात घुमला संजू...संजूचा जयघोष!

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 08 डिसेंबर : =भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरा टी-20 सामना होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात 6 विकेटनं मिळवलेल्या विजयानंतर मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. पुन्हा एकदा ऋषभ पंतला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.

पहिल्या सामन्यात पंतला केवळ 18 धावा करता आल्या होत्या. 2 षटकार त्यानं मारले असले तरी, पुन्हा एकदा बेजबाबदार शॉट खेळत पंत बाद झाला. त्यामुळं होम ग्राऊंडवर संजू सॅमसनला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या सामन्यातही सॅमसनला संधी मिळालेली नाही. याआधी बांगलादेश दौऱ्यातही संजूला बाकावर बसवण्यात आले होते. तर, विडिंज विरोधात शिखर धवननं माघार घेतल्यामुळे शेवटच्या क्षणी संजूला संघात जागा मिळाली, मात्र 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही. असे असले तरी, संजू सराव करण्यासाठी मैदानावर उतरताच संजू...संजू असा जयघोष होत होता. त्याचवेळी रवी शास्त्री यांनी संजूवर मस्करीत हात उगारला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-मालिका विजयासाठी विराटसेना सज्ज! वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

वाचा-VIDEO : ‘माझ्या बहिणीसोबत झोपला खेळाडू’, कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

पंतला किती संधी देणार?

दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि आता वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला संधी देण्यात आल्या. मात्र एकाही सामन्यात पंतला साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेश विरोधात झालेल्या टी-20 मालिकेत पंतकडून यष्टीरक्षण करताना गंभीर चूका झाल्या, त्यामुळे त्याला जोरदार टीकांचा सामना करावा लागला आहे. मात्र असे असले तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याला नेहमी पाठीशी घातले. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात संजू सॅमसनच्या जागी पंतलाच संधी देण्यात आली.

वाचा-संघाची लाजीरवाणी कामगिरी! 10 फलंदाज शून्यावर बाद, गोलंदाजांसमोर दाणादाण

विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजूची दमदार खेळी

केरळकडून खेळताना संजू सॅमसननं विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये यंदाच्या हंगामात द्विशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला होता. त्याशिवाय सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चार सामन्यात आतापर्यंत 112 धावा केल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून 93 सामन्यात संजूनं 27.61च्या सरासरीनं 2209 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय टीम इंडियाकडून 2015मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

वाचा-लग्नानंतर पत्नीच्या स्कुटीवरून भारतीय क्रिकेटपटूची 'विदाई', PHOTO VIRAL

असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2019 07:13 PM IST

ताज्या बातम्या