India Vs West Indies : पंतने कॅच सोडल्यानंतर कॅप्टन कोहलीनं प्रेक्षकांशी घेतला पंगा, VIDEO VIRAL

India Vs West Indies : पंतने कॅच सोडल्यानंतर कॅप्टन कोहलीनं प्रेक्षकांशी घेतला पंगा, VIDEO VIRAL

असं काय झालं की ऋषभ पंतनं कॅच सोडल्यानंतर विराटनं प्रेक्षकांवर राग काढला.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 09 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी-20 सामना तिरुवनंतरपुरम येथे दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताच्या ढिसाळ कामगिरीमुळे विडिंजनं 8 विकेटनं हा सामना जिंकला. त्यामुळं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1नं बरोबरी झाली आहे. तिसरा आणि निर्णायक सामना 11 डिसेंबरला मुंबईत खेळला जाणार आहे.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आणि खेळाडूंनी खराब कामगिरी केली. एकाच सामन्यात तीन महत्त्वाच्या कॅच सोडल्यामुळं भारताला हा सामना गमवावा लागला. पहिल्या सामन्यातही खेळाडूंनी ढिसाळ कामगिरी केली होती. दरम्यान दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने भुवनेश्वर कुमारच्या चौथ्या ओव्हरमध्ये झेल सोडला. त्यानंतर मैदानात प्रेक्षकांनी पंतवर टीका करण्यास सुरुवात केली, आणि धोनी...धोनीचा जयघोष सुरू झाला. मात्र हा जयघोष सुरू झाल्यानंतर विराट कोहलीनं प्रेक्षकांवर राग व्यक्त करत त्यांना शांत राहण्यास सांगितले. याआधीही कोहलीनं पत्रकार परिषदेत प्रेक्षक धोनी, धोनी ओरडून पंतवर दबाव टाकल असल्याचे मत व्यक्त केले होते.

वाचा-VIDEO : लाईव्ह सामन्यात खेळाडूंआधी सापाने लावली हजेरी आणि...

वाचा-टीम इंडियाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहून विराट झाला 'सुपरमॅन', सामन्यानंतर...

रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 171 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने जोरदार सुरुवात केली. वेस्ट इंडीजने 4 षटकांत एकही विकेट न गमावता 24 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर इव्हिन लुईसने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू विकेटकीपरकडे गेला खेळाडूंनी जल्लोष केल्यानंतर त्यांना कळले की पंतने झेल सोडला आहे. ही विकेट टीम इंडियासाठी महत्त्वाची होती. हा झेल सोडल्यानंतर चाहत्यांनी धोनी-धोनीचा जयघोष सुरू केला. सीमेवर उभा असलेला विराट कोहली चाहत्यांवर चिडलेला दिसला आणि त्यांना इशारा करत पंतला पाठिंबा देण्यास सांगितले.

वाचा-टीम इंडियाचा पोरकटपणा, विंडीजविरुद्धच्या 4 चुका पडल्या महागात

याआधी हैदराबाद येथे झालेला पहिला टी-20 सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. दरम्यान आता तिसरा आणि अंतिम टी -20 सामना 11 डिसेंबर रोजी मुंबई येथे खेळला जाणार आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागणार आहे. दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या एकाच ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने लेंडल सिमन्सचा सहज झेल सोडला तर पुढच्याच चेंडूनंतर पंतने लुईसला जीवनदान दिले.

वाचा-IPL जिंकून देण्यासाठी कर्णधाराला केले मालक! कोहलीपेक्षा जास्त आहे खेळाडूची कमाई

लुईसने याचा फायदा घेत सुंदरच्या पुढच्या षटकात दोन प्रचंड षटकार ठोकले आणि त्यानंतर युजवेंद्र चहलने एका षटकारासह त्याचे स्वागत केले. सिमन्सने सुंदर व चहलला षटकारही ठोकले. दरम्यान, सुंदरच्या सल्ल्यानुसार कर्णधार विराट कोहलीने 'रिव्यू' गमावला परंतु शेवटी लुईसला स्टम्प आउट करुन त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. लुईसने तीन चौकार आणि अनेक षटकार लगावले. त्यामुळं मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 01:31 PM IST

ताज्या बातम्या