India vs West Indies : ...म्हणून विराटनं ठरला मैदानात ठेका!

India vs West Indies : ...म्हणून विराटनं ठरला मैदानात ठेका!

विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना 6 शतक लगावण्याची कामगिरी केली आहे.

  • Share this:

त्रिनिदाद, 12 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतकी खेळी केली. विराटच्या या शतकी खेळीच्य जोरावर भारतानं विजय मिळवला. मात्र विराट कोहली 60-65 धावा केल्यानंतर थकून गेला होता. मात्र, त्याला अशाच परिस्थिती खेळावे लागले आणि आपले शतक पूर्ण केले. विराटनं तब्बल 11 डावांनंतर शतकी खेळी केली.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 125 धावांची भागिदारी केली. कोहली 120 धावा करून बाद झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी केली. त्याने 68 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात त्यानं पाच चौकार आणि एक षटकार मारला. अय्यरने 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं धावा केल्या. त्यामुळं विराट आणि अय्यर यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं विंडीजला 279 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 31 धावा देत 4 गडी बाद करून विंडीजची दाणादाण उडवली. पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजला 46 षटकांत 269 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. त्यांना 210 धावांपर्यंत मजल मारता आली. विराटला या स्पर्धेत सामनावीराचा मान मिळाला.

विराटनं सांगितले शतकामागचे रहस्य

सामन्यानंतर चहलनं विराट कोहलीची मुलाखत घेतली. यावेळी विराटनं आपणं कोणत्या परिस्थितीत फलंदाजी केली ते सांगितले. यावेळी विराट, “अर्धशतक केल्यानंतर मी थकून गेलो होतो. खेळण्याची ताकद नव्हती, पण संघाला माझी गरज होती आणि मोठी धावसंख्या उभारायची होती”, असे सांगितले.

वाचा-आमच्याशी नडायचं नाही, विराटनं दिला 'हा' इशारा!

म्हणून भरमैदानात करतो डान्स

यावेळी चहलनं विराटला त्याच्या नाचण्याविषयी आणि डान्स स्टेपबद्दल विचारले. यावेळी विराटनं, “देवानं भारतीय संघासाठी खेळण्याची संधी देवानं दिली आहे, त्याचा मी पुरेपर फायदा घेतो. प्रत्येक क्षण मला एन्जॉय करायचा असतो. म्हणून कुठेही गाणं वाजलं की, मी डान्स करतो, मज्जा करतो. मी कर्णधार असो किंवा नसो, मी मैदानात मस्ती करतो”, असे सांगितले.

सगळ्यात जास्त शतक लगावणारा कर्णधार

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या तरी संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याची कामगिरी विराटनं केली आहे. विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना 6 शतक लगावण्याची कामगिरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त 5 शतक लगावले होते. तर, सचिन तेंडुलकरच्या नावावर संघाविरोधात सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम आहे. सचिननं ऑस्‍ट्रेलियाविरोधात 9 शतक लगावले आहेत. तर, श्रीलंके विरोधात 8 शतक. कोहलीनं श्रीलंका, ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज विरोधात प्रत्येकी 8 शतक लगावले आहेत.

वाचा-विक्रमांचा ‘विराट’ बादशाह! गांगुलीसह अनेक विक्रमवीरांना टाकले मागे

2000 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड

शतकी पारी करत विराटनं 34 डावांत वेस्ट इंडिज विरोधात 2 हजार धावा पूर्ण केल्या. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. विराट कोहली सर्वात कमी डावांमध्ये 2 हजार धावा करणारा खेळाडू झाला आहे. याआधी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरोधात 37 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळं त्यानं रोहितला मागे टाकले.

वाचा-टीम इंडियाचा ‘रनवीर’, तब्बल 11 डावांनंतर झळकावले शतक!

'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 06:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading