टीम इंडियाचा ‘रनवीर’, तब्बल 11 डावांनंतर झळकावले शतक!

वेस्ट इंडिज विरोधात विराटनं आपले 42वे शतक पूर्ण केले.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 07:03 AM IST

टीम इंडियाचा ‘रनवीर’, तब्बल 11 डावांनंतर झळकावले शतक!

त्रिनिदाद, 11 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आक्रमक खेळी केली. वेस्ट इंडिज विरोधात 120 धावांची शतकी खेळी करत त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराटचे हे 42वे शतक आहे. 10 चौकार आणि 1 षटाकारांच्या मदतीनं 112 चेंडूत त्यानं आपलं शतक पूर्ण केलं. मात्र विराटला 42वे शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 11 सामन्यांची वाट पाहावी लागली.

वर्ल्ड कपमध्ये विराटला एकही शतक करता आले नव्हते. वर्ल्ड कप स्पर्धेत विराटनं 5 अर्धशतकी खेळी केल्या होत्या, त्यामुळं तब्बल 11 डावांनंतर ही कामगिरी करण्यात यश आले. याआधी विराटनं 2017मध्ये शतक पूर्ण करण्यासाठी 11 डावांची वाट पाहिली होती. त्यानंतर विराटनं वेस्ट इंडिज विरोधातच शतक लगावले होते.

सगळ्यात जास्त शतक लगावणारा कर्णधार

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या तरी संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याती कामगिरी विराटनं केली आहे. विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना 6 शतक लगावण्याती कामगिरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त 5 शतक लगावले होते. तर, सचिन तेंडुलकरच्या नावावर संघाविरोधात सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम आहे. सचिननं ऑस्‍ट्रेलियाविरोधात 9 शतक लगावले आहेत. तर, श्रीलंके विरोधात 8 शतक. कोहलीनं श्रीलंका, ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज विरोधात प्रत्येकी 8 शतक लगावले आहेत.

वाचा-रोहित-विराटनं टीकाकारांना दिले चोख उत्तर, मोडला सर्वात मोठा विक्रम!

Loading...

2000 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड

शतकी पारी करत विराटनं 34 डावांत वेस्ट इंडिज विरोधात 2 हजार धावा पूर्ण केल्या. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. विराट कोहली सर्वात कमी डावांमध्ये 2 हजार धावा करणारा खेळाडू झाला आहे. याआधी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरोधात 37 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळं त्यानं रोहितला मागे टाकले.

वाचा-विराटच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पाक खेळाडूला टाकले मागे!

विराटनं मोडला जावेद मियाँदादचा विक्रम

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. कर्णधार कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात फलंदाजी करताना 20 धावा करत पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडला. विराटनं पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचा विक्रम मागे टाकला आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी 1993 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. मियाँदाद यांनी विंडीजविरुद्ध 64 डावात 1930 धावा केल्या होत्या. विराटनं फलंदाजी करताना केवळ 19 धावा करत 34 डावांमध्ये मियॉंदाद यांचा हा विक्रम मोडला. विराटच्या या खेळीत सात शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. या तुलनेत मियाँदाद यांनी फक्त एक शतक आणि 12 अर्धशतकं केली आहेत

वाचा-ऑपरेशननंतर भावूक झाला सुरेश रैना, म्हणाला...

Special Report : कडक सॅल्युट! पुरात अडकलेल्यांसाठी देवदूत ठरलेल्या वर्दीतल्या 'बाप' माणसांचा VIDEO पाहून ऊर येईल भरून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 11:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...