India vs West Indies : युवा खेळाडूंवर मधल्या फळीची भिस्त, अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन

India vs West Indies : युवा खेळाडूंवर मधल्या फळीची भिस्त, अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन

ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांकडून मधल्या फळीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

  • Share this:

गयाना, 11 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान आज दुसरा सामना खेळला जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 13 ओव्हरचा खेळवण्यात आला. या सामन्यात ख्रिस गेल चार धावा करत बाद झाला. तर एविन लुईसनं नाबाद 40 धावांची खेळी केली. दरम्यान पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते. मनीष पांडे आणि केएल राहुल यांना संघात जागा मिळाली नव्हती. त्यामुळं दुसऱ्या सामन्यातही श्रेयस अय्यरला संघात जागा मिळू शकते.

भारताला असलेली मधल्या फळीची चिंता ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे युवा खेळाडू मिटवू शकतील अशी अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. कारण, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची ही अखेरची एकदिवसीय मालिका असणार आहे. त्यामुळं दोन्ही संघ पहिला सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.

पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच काढता आल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र त्यानं तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं. भारताच्या यष्टीरक्षकानं एका टी20 सामन्यात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. ऋषभ पंतच्या या खेळीच्या जोरावर भारतानं क्लिन स्वीप देत ही मालिका आपल्या खिशात घातली.

वाचा-विराट मोडणार पाकच्या माजी कर्णधाराचा 26 वर्षांपूर्वीचा विक्रम!

विराटकडे मोठे रेकॉर्ड तोडण्याची संधी

एकदिवसीय क्रिकेट नेहमीच आपला दबदबा राखणारा कोहली आता टी-20 सोबतच एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप देण्याच्या तयारीत आहे. यासोबतच विराटकडे एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. वेस्ट इंडिज विरोधात चांगली फलंदाजी करण्याचा इतिहास विराटच्या नावावर आहे. त्यानं 33 सामन्यात 70.81च्या सरासरीनं 1912 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये विराटला एकही शतक लगावता आले नाही, त्यामुळे वेस्ट इंडिज विरोधात विराट ही कामगिरी करू शकतो.

वाचा-विराटची बॅटिंग शास्त्रींचं समालोचन, शेअर केला हा VIDEO

असा असेल भारताचा संभाव्य संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, मनीष पांडे, केदार जाधव/श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी

वाचा-VIDEO : ऋषभ पंतचा थेट हॉटेलच्या पॅसेजमध्येच सराव; कारण देताना म्हणाला...

VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत सगळ्याची सोय

Published by: Akshay Shitole
First published: August 11, 2019, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading