IND vs WI : विराट-रोहितला विक्रमाची संधी, पुन्हा कमाल करणार का?

IND vs WI : विराट-रोहितला विक्रमाची संधी, पुन्हा कमाल करणार का?

दुसऱ्या सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीशिवाय चुका सुधारण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. यासह वातावरणाचाही सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 18 डिसेंबर : विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिला सामना भारताने गमावला. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं भारतीय संघाला गरजेच आहे. विशाखापट्टणम मध्ये दुसरा सामना खेळला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडिजच्या फलंदाजांना तुफान फटकेबाजी केली. तर भारतीय फलंदाज मात्र ढेपाळले. दुसऱ्या सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीशिवाय चुका सुधारण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. यासह वातावरणाचाही सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार सकाळी ढगाळ हवामान असेल. मात्र पावसाची शक्यता खूप कमी असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. तापमान 27 अंश सेल्सियस ते 19 अंश सेल्सियस इतकं असेल.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना गेल्या काही एकदिवसीय सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे संघाची सुरुवातही खराब झाली होती. दुसऱ्या वनडेमध्ये दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दोघांसाठी विशाखापट्टणमचे मैदान खास आहे.

सर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रम विराट आणि रोहितच्या नावावर आहे. दोघांनी या मैदानावर 163 धावांची भागिदारी केली होती. तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम विराटच्या नावावर आहे. गेल्या वर्षी विंडिजविरुद्ध विराटने नाबाद 157 धावांची खेळी केली होती. आजच्या सामन्यातही मोठी भागिदारी करून नवा विक्रम करण्याची संधी विराट-रोहितला असणार आहे.

चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज साफ अपयशी ठरले. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली धावा करू शकले नाही. त्यानंतर श्रेयस अय्यरने 70 धावा तर ऋषभ पंतने 71 धावांची खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर पुन्हा डाव घसरला.

वाचा : भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया टीममध्ये मोठे बदल, संघ जाहीर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ind vs wi
First Published: Dec 18, 2019 09:13 AM IST

ताज्या बातम्या