IND vs WI 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी विराट सेना सज्ज, 'या' चॅनलवर पाहा लाईव्ह मॅच

पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना त्रिनिनादमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

  • Share this:

भारतीय संघाने टी-20 मालिकेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना त्रिनिनादमधील क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, या मालिकेत केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी पुनरागमन करणार आहेत. पण, अजूनही चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न कायम आहे. त्यामुळं विराट कोहली कोणाला संधी देणार, हे पाहावे लागणार आहे.

दुसरीकडे वेस्ट इंडिजसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. कारण, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा ही अखेरची एकदिवसीय मालिका असणार आहे.

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर (कर्णधार) केमार रोच.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा टी-20 सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना 7 वाजता सुरु होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2019 08:30 AM IST

ताज्या बातम्या