India vs West Indies Test Match : ‘या’ 11 खेळाडूंची टीम इंडियात जागा फिक्स! विराटनं सांगितली प्लेइंग इलेव्हन

India vs West Indies Test Match : ‘या’ 11 खेळाडूंची टीम इंडियात जागा फिक्स! विराटनं सांगितली प्लेइंग इलेव्हन

India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 22 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. अँटिगुआ येथील नॉर्थ साऊंडच्या व्हिव रिचर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 8 वाजता सुरु होईल. दोन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीनं कोणत्या फलंदाजांना संघात स्थान मिळणार त्यांची माहिती दिली. विराट कोहलीनं सलामीला कोणते फलंदाज येणार आणि कोणत्या गोलंदाजांना संघात जागा मिळणार याबाबत सांगितले.

सामन्याआधी कोहलीनं पत्रकारांशी बोलताना, “सलामीच्या फलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास दोन फलंदाजांची निवड आम्ही केली आहे. आमचा हेतू एवढाच आहे की हे दोन फलंदाज चारही डावांमध्ये खेळू शकतील. सराव सामन्यात मयंक अग्रवालनं चांगली कामगिरी केली, केएल राहुलही तांगली खेळला”, असे सांगत हनुमा विहारी या युवा खेळाडूचेही कौतुक केले.

यावेळी विराटनं, “तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल की तुम्ही संघात काय बदल करता. मेलबर्नमधील कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास हनुमा विहारी आणि मयंकनं खुप चांगली खेळी केली. हनुमाची 18 आणि 20 धावांची खेळी महत्त्वाची होती”, असे मत व्यक्त केले.

विहारी आणि रोहित शर्मा यांना मिळणार संधी

पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार याबाबत विराटनं, “विहारीला जेव्हा जेव्हा संघात स्थान दिले आहे, तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र कोणते दोन खेळाडू खेळवणार हे पाहावे लागणार आहे. रोहितनं मेलबर्न क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती”, असे सांगत. “विहारी काही ओव्हर गोलंदाजीही करू शकतो, रोहितची खेळी सर्वांना माहित आहे. त्याची शैली खुप चांगली आहे. रोहित आणि विहारी खुप चांगलं समीकरण आहे”, अशी माहिती दिली. भारताकडून मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. तसेच, संघात 3 वेगवान गोलंदाज व एक फिरकीपटू किंवा 2 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटू असे कॉम्बिनेशन असू शकते.

वाचा-‘सचिनचे सर्व रेकॉर्ड विराट मोडेल पण…’ सेहवागचे कॅप्टन कोहलीला चॅलेंज

टेस्ट चॅम्पियनशीप महत्त्वाची

“टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेमुळं कसोटी क्रिकेटला एक नवी ओळख आणि दृष्टी मिळेल. कसोटी क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलेल. जेव्हा प्रत्येक सामन्यात तुम्हाला गुण मिळवायचे आहेत हे तुमच्या डोक्यात असते, तेव्हा प्रत्येक सामना हा अत्यंत महत्वाचा ठरतो. या स्पर्धेमुळे संघातील स्पर्धा आणखी तीव्र होईल. कसोटी क्रिकेट सामन्यांकडे अधिक लक्ष पुरवलं जाईल आणि सामने अधिक रंगतदार होतील.”, असेही विराट म्हणाला.

वाचा-फॉरेनचा जावई! हसन अलीनंतर 'हा' ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करणार भारतीय मुलीशी लग्न

चार की पाच गोलंदाज?

खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी असेल, तर भारतीय संघ चार विशेषज्ञ गोलंदाजांसह खेळेल. जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. त्यामुळे एकमेव फिरकी गोलंदाजाच्या स्थानासाठी रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यात तीव्र स्पर्धा असेल. खेळपट्टीचे हिरवेगार स्वरूप पाहता कोहलीकडे पाच गोलंदाजांसह खेळण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या परिस्थितीत अष्टपैलू रवींद्र जडेजा संघात स्थान मिळवेल आणि रहाणे किंवा रोहित यापैकी एक जण संघात असेल.

वाचा-धोनीच्या ‘त्या’ एका निर्णयावर भडकला सेहवाग, म्हणाला...

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक).

वेस्ट इंडिजचा संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कोर्नवॉल, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

Published by: Renuka Dhaybar
First published: August 22, 2019, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading