India vs West Indies : ...म्हणून रोहितला मिळाला संघातून डच्चू, विराटनं दिलं स्पष्टीकरण

India vs West Indies : ...म्हणून रोहितला मिळाला संघातून डच्चू, विराटनं दिलं स्पष्टीकरण

विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली.

  • Share this:

अँटिगुआ, 26 ऑगस्ट : विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. बुमराहनं अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं 31 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात रहाणेनं 102 धावांची तर हनुमा विहारीनं 93 धावांची खेळी केली. पहिल्या डावात भारताने 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजला 222 धावांपर्यंत मजल मारता आली होती. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला संघात जागा दिली नव्हती. यावर कोहलीनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

विराटनं सामन्यानंतर, “मला माहिती आहे की संघ निवडीवर अनेक चर्चा होतील याची कल्पना होती. मात्र 11 खेळाडूंची निवड ही गंभीर चर्चा करून, संघासाठी केली होती”, असे सांगितले. टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची सुरुवात वेस्ट इंडिज विरोधात झाली. यात पहिल्याच सामन्यात भारतानं तब्बल 318 धावांनी विजय मिळवत 60 गुण आपल्या नावावर केले. या सामन्यात फिरकीपटू अश्विन आणि रोहित शर्मा यांना संघातून वगळण्यात आले होते. मात्र याबाबत विराटनं आता स्पष्टीकरण दिले आहे.

जडेजानं स्वत:ला सिध्द केले

पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनच्या जागी संघात जडेजाला स्थान देण्यात आले. मात्र पहिल्या डावात महत्त्वपूर्ण अशी अर्धशतकी खेळी करत त्यानं स्वत:ला सिध्द केले. कोहलीनं सामन्यानंतर जडेजाचे कौतुक करताना, “आम्ही चर्चा करून ठरवतो की संघात कोणाला जागा द्यावी. संघासाठी फायदेशीर निर्णयच आम्ही घेतो. अंतिम 11मध्ये संघात सामिल झालेल्या खेळाडूंवर नेहमीच चर्चा होत असते, मात्र सर्व निर्णय हे संघ हितासाठी असतात”, असे सांगितले.

वाचा-टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

या कारणामुळं रोहित शर्माच्या जागी विहारीला मिळाली संधी

अनुभवी रोहित शर्माच्या जागी पहिल्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू हनुमा विहारीला संघात स्थान दिले. आंध्र प्रदेशच्या या फलंदाजानं दुसऱ्या डावात 93 धावा केल्या, तर पहिल्या डावातही महत्त्वपूर्ण अशा 32 धावा केल्या. यावर कोहलीनं, “विहारीला संघात जागा मिळाली कारण तो संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. फलंदाजी आणि कामचलाऊ गोलंदाजीमध्येही त्याचा वापर झाला असता. त्यामुळं विहारीला संघात जागा देण्यात आली आणि त्यानं चांगली कामगिरीही केली.

वाचा-IND vs WI : विंडीजवर दणदणीत विजयानंतरही विराटला टेन्शन!

बुमराहवरचा ताण कमी करण्याची गरज

यावेळी पाच विकेत घेत वेस्ट इंडिजची कंबर मोडणाऱ्या जसप्रीत बुमराहचे विराटनं कौतुक केले. तसेच, “बुमराहवर कामाचे प्रेशर नक्कीच आहे. वर्ल्ड कपनंतर म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र जोपर्यंत टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरू आहे, तोपर्यंत बुमराह संघात असेल”, असे विराटनं सांगितले.

वाचा-बुमराहनं रचला इतिहास, कसोटीत 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

राहणेचे तोंडभरून कौतुक

भारतीय संघाचे उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं पहिल्या डावात 80 आणि दुसऱ्या डावात 102 धावा केल्या. त्यामुळं सामनावीराचा पुरस्कार रहाणेला देण्यात आला. यावेळी रहाणेचे कौतुक करताना, “रहाणेनं दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली. केएल आणि विहारी यांनीही संयमी खेळ केला. मात्र सामन्यात ती ते चार वेळा आम्हाला जोर लावावा लागला”, असे मत विराटनं व्यक्त केले.

वाचा-अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार!

VIDEO: निवडणुकीवरून भररस्त्यात मुलींमध्ये तुफान राडा

Published by: Suraj Yadav
First published: August 26, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading