India vs West Indies Test Match : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला; भारताची प्रथम फलंदाजी

India vs West Indies Test Match : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला; भारताची प्रथम फलंदाजी

  • Share this:

अँटिगुआ, 22 ऑगस्ट :  वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटीतही आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. याचबरोबर भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अँटिगुआ येथील नॉर्थ साऊंडच्या व्हिव रिचर्ड्स मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्या खेळाकडे विशेष लक्ष असणार आहे. कसोटी क्रिकेटमधले महत्त्वाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहेत. पुजारानं सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. तर, दुसऱ्या सराव सामन्यात रहाणेनं अर्धशतकी कामगिरी केली होती. त्यामुळं दोन्ही फलंदाजांकडून विराट कोहलीला अपेक्षा आहेत.

विराट कोहलीचा शानदार फॉर्म

चांगल्या फॉर्ममध्ये असलेला कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतक लगावणारा विराटनं एक शतक केल्यास रिकी पॉंटिंगच्या विक्रमाची बरोबरी करेल. कोहलीनं कर्णधार म्हणून 18 कसोटी शतक लागवले आहे.

टेस्ट चॅम्पियनशीपला होणार सुरुवात

पहिल्या कसोटी सामन्यासह भारतीय संघाचा टेस्ट चॅम्पियनशीपमधला प्रवासही सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकूण 9 संघ सहभागी होणार आहेत. यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूजीलँड या संघाचा समावेश असणार आहे. प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण असतात, तर सामन्यांसाठी 60 गुण आहेत. त्यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ 60 गुण मिळवू शकतात. याबाबत कर्णधार विराट कोहलीनं “टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेमुळं कसोटी क्रिकेटला एक नवी ओळख आणि दृष्टी मिळेल. कसोटी क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलेल. जेव्हा प्रत्येक सामन्यात तुम्हाला गुण मिळवायचे आहेत हे तुमच्या डोक्यात असते, तेव्हा प्रत्येक सामना हा अत्यंत महत्वाचा ठरतो. या स्पर्धेमुळे संघातील स्पर्धा आणखी तीव्र होईल. कसोटी क्रिकेट सामन्यांकडे अधिक लक्ष पुरवलं जाईल आणि सामने अधिक रंगतदार होतील.”, असे मत व्यक्त केले.

वाचा-टेस्ट चॅम्पियनशीपचा टीम इंडियाचा प्रवास होणार सुरू, येथे पाहा पहिला सामना LIVE

वाचा-टीम इंडियासाठी कसोटी मालिका महत्त्वाची, 60 गुणांसाठी होणार खरी लढत!

असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), इशांत शर्मा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा.

असा आहे संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कोर्नवॉल, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

वाचा-‘सचिनचे सर्व रेकॉर्ड विराट मोडेल पण…’ सेहवागचे कॅप्टन कोहलीला चॅलेंज

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

Published by: Renuka Dhaybar
First published: August 22, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading