India vs West Indies Test Match : टेस्ट चॅम्पियनशीपचा टीम इंडियाचा प्रवास होणार सुरू, येथे पाहा पहिला सामना LIVE

India vs West Indies Test Match : टेस्ट चॅम्पियनशीपचा टीम इंडियाचा प्रवास होणार सुरू, येथे पाहा पहिला सामना LIVE

टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटीतही आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 22 ऑगस्ट : टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटीतही आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. याचबरोबर भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू होणार आहे. अँटिगुआ येथील नॉर्थ साऊंडच्या व्हिव रिचर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 8 वाजता सुरु होईल. आजच्या सामन्यात विराटसेना पहिल्यांदा क्रमांक असलेली पांढरी जर्सी परिधान करून मैदानात उतरतील.

दरम्यान, या सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंना विराट जागा देणार हे सुध्दा महत्त्वाचे आहे. कसोटी क्रिकेटमधले महत्त्वाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहेत. पुजारानं सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. तर, दुसऱ्या सराव सामन्यात रहाणेनं अर्धशतकी कामगिरी केली होती. त्यामुळं दोन्ही फलंदाजांकडून विराट कोहलीला अपेक्षा आहेत.

येथे पाहू शकता सामना लाईव्ह

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अँटिगुआ येथे होणारा पहिला कसोटी सामना सोनी टेन आणि सोनी टेन 3वर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय Soni HDवरही सामना पाहू शकता.

वाचा-टीम इंडियासाठी कसोटी मालिका महत्त्वाची, 60 गुणांसाठी होणार खरी लढत!

विराट कोहलीचा शानदार फॉर्म

चांगल्या फॉर्ममध्ये असलेला कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतक लगावणारा विराटनं एक शतक केल्यास रिकी पॉंटिंगच्या विक्रमाची बरोबरी करेल. कोहलीनं कर्णधार म्हणून 18 कसोटी शतक लागवले आहे.

वाचा-‘या’ 11 खेळाडूंची टीम इंडियात जागा फिक्स! विराटनं सांगितली प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा की हनुमा विहारी कोणाला मिळणार संधी?

पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार याबाबत विराटनं, “विहारीला जेव्हा जेव्हा संघात स्थान दिले आहे, तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र कोणते दोन खेळाडू खेळवणार हे पाहावे लागणार आहे. रोहितनं मेलबर्न क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती”, असे सांगत. “विहारी काही ओव्हर गोलंदाजीही करू शकतो, रोहितची खेळी सर्वांना माहित आहे. त्याची शैली खुप चांगली आहे. रोहित आणि विहारी खुप चांगलं समीकरण आहे”, अशी माहिती दिली. भारताकडून मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. तसेच, संघात 3 वेगवान गोलंदाज व एक फिरकीपटू किंवा 2 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटू असे कॉम्बिनेशन असू शकते.

वाचा-‘सचिनचे सर्व रेकॉर्ड विराट मोडेल पण…’ सेहवागचे कॅप्टन कोहलीला चॅलेंज

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक).

वेस्ट इंडिजचा संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कोर्नवॉल, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

वाचा-प्रेग्नेंट अभिनेत्रीसोबत हार्दिक पांड्याचा स्टाइलिश रॅम्प वॉक!

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

Published by: Renuka Dhaybar
First published: August 22, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading