India vs West Indies : टीम इंडियासाठी विंडिज विरोधातील कसोटी मालिका महत्त्वाची, 60 गुणांसाठी होणार खरी लढत!

India vs West Indies : टीम इंडियासाठी विंडिज विरोधातील कसोटी मालिका महत्त्वाची, 60 गुणांसाठी होणार खरी लढत!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. याचबरोबर भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू होणार आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 22 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. याचबरोबर भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू होणार आहे. अँटिगुआ येथील नॉर्थ साऊंडच्या व्हिव रिचर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 8 वाजता सुरु होईल. दोन सामन्याच्या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियात 60 गुण निश्चित करू शकतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकूण 9 संघ सहभागी होणार आहेत. यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूजीलँड या संघाचा समावेश असणार आहे. प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण असतात, तर सामन्यांसाठी 60 गुण आहेत. त्यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ 60 गुण मिळवू शकतात.

सात महिन्यांनंतर करणार पुजारा आणि रहाणे कमबॅक

कसोटी क्रिकेटमधले महत्त्वाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहेत. पुजारानं सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. तर, दुसऱ्या सराव सामन्यात रहाणेनं अर्धशतकी कामगिरी केली होती. त्यामुळं दोन्ही फलंदाजांकडून विराट कोहलीला अपेक्षा आहेत.

विराट कोहलीचा शानदार फॉर्म

चांगल्या फॉर्ममध्ये असलेला कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतक लगावणारा विराटनं एक शतक केल्यास रिकी पॉंटिंगच्या विक्रमाची बरोबरी करेल. कोहलीनं कर्णधार म्हणून 18 कसोटी शतक लागवले आहे.

वाचा-‘या’ 11 खेळाडूंची टीम इंडियात जागा फिक्स! विराटनं सांगितली प्लेइंग इलेव्हन

विहारी आणि रोहित शर्मा यांना मिळणार संधी

पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार याबाबत विराटनं, “विहारीला जेव्हा जेव्हा संघात स्थान दिले आहे, तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र कोणते दोन खेळाडू खेळवणार हे पाहावे लागणार आहे. रोहितनं मेलबर्न क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती”, असे सांगत. “विहारी काही ओव्हर गोलंदाजीही करू शकतो, रोहितची खेळी सर्वांना माहित आहे. त्याची शैली खुप चांगली आहे. रोहित आणि विहारी खुप चांगलं समीकरण आहे”, अशी माहिती दिली. भारताकडून मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. तसेच, संघात 3 वेगवान गोलंदाज व एक फिरकीपटू किंवा 2 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटू असे कॉम्बिनेशन असू शकते.

वाचा-‘सचिनचे सर्व रेकॉर्ड विराट मोडेल पण…’ सेहवागचे कॅप्टन कोहलीला चॅलेंज

टेस्ट चॅम्पियनशीप महत्त्वाची

“टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेमुळं कसोटी क्रिकेटला एक नवी ओळख आणि दृष्टी मिळेल. कसोटी क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलेल. जेव्हा प्रत्येक सामन्यात तुम्हाला गुण मिळवायचे आहेत हे तुमच्या डोक्यात असते, तेव्हा प्रत्येक सामना हा अत्यंत महत्वाचा ठरतो. या स्पर्धेमुळे संघातील स्पर्धा आणखी तीव्र होईल. कसोटी क्रिकेट सामन्यांकडे अधिक लक्ष पुरवलं जाईल आणि सामने अधिक रंगतदार होतील.”, असेही विराट म्हणाला.

वाचा-फॉरेनचा जावई! हसन अलीनंतर 'हा' ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करणार भारतीय मुलीशी लग्न

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक).

वेस्ट इंडिजचा संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कोर्नवॉल, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

वाचा-Paytmने लावली रेकॉर्डब्रेक बोली, भारतीय क्रिकेटमध्ये मिळाला सर्वात मोठा अधिकार!

VIDEO : शिवसेनेच्या संजय राऊतांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया, ऐका काय म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: team india
First Published: Aug 22, 2019 01:42 PM IST

ताज्या बातम्या