IND vs WI, 1st Test, Day 3 : भारतीय गोलंदाजांनी 222 धावांत गुंडाळला विंडिजचा डाव!

IND vs WI, 1st Test, Day 3 : भारतीय गोलंदाजांनी 222 धावांत गुंडाळला विंडिजचा डाव!

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

  • Share this:

अँटिगुआ, 24 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 222 धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात 297 धावा केल्या. त्यामुळं भारताकडे अद्याप 75 धावांची आघाडी आहे. यात भारताकडून ईशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन, बुमराहनं एक विकेट घेतली.

तिसऱ्या दिवशी जेसन होल्डर 10 धावांवर खेळत होता. तर मिगुएल कमिन्स त्याच्यासोबत मैदानात होता. मात्र 73व्या ओव्हरमध्ये शमीनं होल्डरला माघारी पाठवले तर, कमिन्सची विकटे जडेजानं घेतली. वेस्ट इंडिजकडून रॉसट्न चेसनं सर्वात जास्त म्हणजे 48 धावांची खेळी केली.

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या 6 बाद 203 धावांवरून पुढे खेळताना भारताला 297 धावांपर्यंत मजल मारता आली. ऋषभ पंतला फक्त 4 धावांची भर घालता आली. तो 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने 58 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने इशांत शर्माने त्याला साथ दिली. इशांत शर्मा 19 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडीजकडून केमार रोचने चार तर शेनॉन गॅब्रियलनं तीन गडी बाद केले.

भारताचा पहिला डाव आटोपल्यानंतर गोलंदाजांनीसुद्धा जबरदस्त कामगिरी केली. विंडीजकडून रोस्टन चेजनं सर्वाधिक 48 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर फलंदाज इशांत शर्माच्या माऱ्यासमोर टिकू शकले नाहीत. विंडीजला मोहम्मद शमीने पहिला दणका दिला. त्यानं कॅपबेलला त्रिफळाचित केलं. त्यानंत ईशांत शर्मानं ब्रेथवेटला बाज केलं. त्यानंतर जडेजानं ब्रूक्सला बाद करून विंडीजला तिसरा धक्का दिला. त्यानंतर बुमराहनं ड्वेन ब्राव्होला पायचित केलं. तेव्हा विंडीजची अवस्था 4 बाद 88 अशी झाली होती. टोस्टन चेजनं शाय होपच्या साथीने डाव सावरला असताना इशांत शर्मानं ही जोडी फोडली. 130 धावांवर रोस्टन चेज बाद झाला. त्यानंतर इशांतने शाय होप, हेटमायर आणि केमार रोचला बाद केलं.

इशांत शर्मानं घेतल्या पाच विकेट

इशांत शर्मानं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. इशांत शर्माच्या या खेळीमुळं वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा बॅकफूटवर गेला. दरम्यान इशांत शर्माच्या या कामगिरी मागे बुमराहचा सर्वात मोठा हात होता. बुमराहनं शर्माला ‘क्रॉस-सीम’ (Cross Seam) चेंडू टाकण्यास सांगितले. शर्मानं केवळ 42 धावा देत पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. दरम्यान तब्बल नव्यांदा शर्मानं ही कामगिरी केली. इशांतनं बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बुमराहचे आभार मानत, “पावसामुळं चेंडू ओला झाला होता. त्यामुळं क्रॉस-सीम गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि त्याचा फायदा झाला” असे सांगितले.

डोंबिवलीत दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2019, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading