Elec-widget

India vs West Indies : बुमराहच्या आऊट स्विंगनं केली कमाल! टेस्ट रॅकिंगमध्ये घेतली हनुमान उडी

India vs West Indies : बुमराहच्या आऊट स्विंगनं केली कमाल! टेस्ट रॅकिंगमध्ये घेतली हनुमान उडी

25 वर्षीय भारतीय गोलंदाज सध्या भारतासाठी हुकुमी एक्क आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 27 ऑगस्ट : विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. बुमराहनं अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं 31 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात रहाणेनं 102 धावांची तर हनुमा विहारीनं 93 धावांची खेळी केली. पहिल्या डावात भारताने 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजला 222 धावांपर्यंत मजल मारता आली होती. यावेळी भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात इशांत शर्मानं पाच तर, दुसऱ्या डावात बुमराहनं सहा विकेट घेतल्या. दरम्यान यावेळी बुमराहच्या कौशल्याचे आणि सातत्याचे कौतुक कर्णधार विराट कोहलीनेही केले.

दरम्यान बुमराहनं पहिल्यांदाच आपल्या गोलंदाजीत सुधार झाल्याचे आणि नवीन तंत्रज्ञान वापरत असल्याचे सांगितले. रोहित शर्मानं घेतलेल्या एका मुलाखतीत बुमराहनं आपल्या गोलंदाजीबद्दल माहिती दिली. यावेळी, “मी नेहमी माझ्या कौशल्य कसे चांगले करता येईल याकडे लक्ष देतो. त्यात आता मला आऊट स्विंगचा फायदा होत आहे, याचा आनंद आहे. गेल्या वर्षी मला चेंडू आऊट स्विंग करता येत नव्हता. मात्र आता ती कला मला अवगत झाली आहे”, असे बुमराहनं सांगितले. दरम्यान या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये विकेटचे अर्धशतक करणारा गोलंदाज बुमराह बनला आहे.

वाचा-शास्त्रींनी शेअर केला बीचवरचा PHOTO, सोशल मीडियावर झाले जबरदस्त ट्रोल

इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी भारतानं 1-4च्या फरकानं मालिका गमावली. यासंदर्भात बुमराहनं, “सुरुवातीला मी इन स्विंग गोलंदाजी करायचो, कसोटी सामने खेळल्यानंतर मला आऊट स्विंग करण्याचा आत्मविश्वास आला, इंग्लंड दौऱ्यानंतर विशेषत:”, असे सांगितले. 25 वर्षीय भारतीय गोलंदाज सध्या भारतासाठी हुकुमी एक्क आहे. त्यानं आतापर्यंत एकूम 11 कसोटी सामने खेळले आहे. यात 20.63च्या सरासरीनं 55 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

वाचा-धोनीच्या निवृत्तीवरून गांगुलीनं भारतीय संघाला दिला सल्ला!

ब्रेक खुप महत्त्वाचा

आयपीएल आणि वर्ल्ड कप असे सतत वर्षभर क्रिकेट खेळणाऱ्या बुमराहला वेस्ट इंडिज दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्रांती देण्यात आली. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये त्याला संघात जागा मिळाली. याबद्दल बुमराहला विचारले असता, “ब्रेकनंतर खेळताना पहिल्या डावात मला चांगली गोलंदाजी करता आली नाही. मात्र दुसऱ्या डावात माझा जम बसला”, असे सांगितले.

टेस्ट रॅकिंगमध्येही झाला फायदा

वेस्ट इंडिज विरोधात 6 विकेट घेत बुमराह आयसीसी रॅकिंगमध्ये पहिल्यांदाच टॉप 10 गोलंदाजांमध्ये पोहचला आहे. बुमराहनं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये पाच विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तसेच, तीन मालिकेत अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे. त्यामुळं बुमरानं 9 स्थानांची प्रगती करत 774 अंकांसह सातव्या स्थानावर उडी घेतली आहे.

वाचा-असा षटकार दररोज मारला जात नाही, पाहा बेन स्टोकचा अफलातून सिक्सर!

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...