India vs West Indies : कॅरेबियन मैदानात कॅप्टन कोहलीचा दांडिया डान्स, VIDEO VIRAL

India vs West Indies : कॅरेबियन मैदानात कॅप्टन कोहलीचा दांडिया डान्स, VIDEO VIRAL

कर्णधार विराट कोहलीनेही अनेक विक्रम नावावर केले. मात्र, या सामन्यात कोहलीचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.

  • Share this:

अँटिगुआ, 26 ऑगस्ट : भारतानं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. भारतानं तब्बल 318 धावांनी यजमान वेस्ट इंडिजला त्यांचा घरच्या मैदानावर नमवलं. दरम्यान, दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार फलंदाजीच्या जारोवर भारताने हा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनेही अनेक विक्रम नावावर केले. मात्र, या सामन्यात कोहलीचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.

विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. बुमराहनं अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं 31 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले. तत्पूर्वी, भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात रहाणेनं 102 धावांची तर हनुमा विहारीनं 93 धावांची खेळी केली. त्यामुळं भारताला बलाढ्या आघाडी मिळाली. चहापर्यंतच वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला होता. दरम्यान तेव्हाच कोहलीनं मैदानात जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. कोहलीनं चक्क दांडिया खेळताना दिसला. यावर चाहत्यांनी कोहलीची नवरात्र आली का, असा सवाल विचारला.

वाचा-...म्हणून रोहितला मिळाला संघातून डच्चू, विराटनं दिलं स्पष्टीकरण

बुमराहनं रचला इतिहास

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 5 गडी बाद करून इतिहास रचला आहे. त्यानं फक्त 7 धावात 5 गडी बाद केले. यासह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज या देशांविरुद्ध एकाच डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहनं 11 कसोटी सामने खेळले असून त्यानं या चारही देशांविरुद्धच्या पहिल्याच दौऱ्यात ही कामगिरी केली आहे.

वाचा-अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार!

720 दिवसांनी अजिंक्य रहाणेची शतकी खेळी

अजिंक्य रहाणेनं तब्बल 2 वर्षांनंतर शतकी कामगिरी केली. यासह भारतानं 300चा आकडा गाठला. अजिंक्य रहाणेचे हे दहावे शतक असून, विहारी आणि कोहली यांच्यासोबत त्यानं शतकी भागिदारीही केली. कसोटी क्रिकेटचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं 2017मध्ये श्रीलंकेविरोधात शतकी कामगिरी केली होती. त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी वेस्ट इंडिज विरोधात त्यानं ही कामगिरी केली आहे. दरम्यान पहिल्या डावातही अजिंक्यनं 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. 2011मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रहाणेनं 56 सामन्यात 3 हजार 488 धावा केल्या आहेत. यात 9 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, 188 ही त्याची सर्वोत्कृष्ठ खेळी राहिली आहे.

वाचा-बुमराहनं रचला इतिहास, कसोटीत 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

विराटनं रोहितला संघात न घेण्याबाबत स्पष्टीकरण

अनुभवी रोहित शर्माच्या जागी पहिल्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू हनुमा विहारीला संघात स्थान दिले. आंध्र प्रदेशच्या या फलंदाजानं दुसऱ्या डावात 93 धावा केल्या, तर पहिल्या डावातही महत्त्वपूर्ण अशा 32 धावा केल्या. यावर कोहलीनं, “विहारीला संघात जागा मिळाली कारण तो संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. फलंदाजी आणि कामचलाऊ गोलंदाजीमध्येही त्याचा वापर झाला असता. त्यामुळं विहारीला संघात जागा देण्यात आली आणि त्यानं चांगली कामगिरीही केली.

वाचा-टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

VIDEO : काश्मिरच्या मुद्यावर मध्यस्ती करणाऱ्या ट्रम्प यांना मोदींनी दिला इशारा

Published by: Suraj Yadav
First published: August 26, 2019, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading