IND vs WI, 1st Test, Day4 : भारताचा 318 धावांनी विजय, रहाणेच्या शतकानंतर विंडीजला बुमराहचा दणका

IND vs WI, 1st Test, Day4 : भारताचा 318 धावांनी विजय, रहाणेच्या शतकानंतर विंडीजला बुमराहचा दणका

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या शतकानंतर बुमराह, इशांत शर्मा आणि शमी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर चौथ्याच दिवशी भारताने विजय मिळवला.

  • Share this:

अँटिगुआ, 26 ऑगस्ट : विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. बुमराहनं अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं 31 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात रहाणेनं 102 धावांची तर हनुमा विहारीनं 93 धावांची खेळी केली. पहिल्या डावात भारताने 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजला 222 धावांपर्यंत मजल मारता आली होती.

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर तिसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या होत्या. दरम्यान चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विराट कोहली 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हनुमा विहारीनं अजिंक्य रहाणेसोबत भारताचा डाव पुढे नेला. रहाणे आणि विहारी यांनीही पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. यात हनुमा विहारीनं आपल्या अर्धशतक तर, रहाणेनं आपले 9वे शतक पूर्ण केले. या शतकासह रहाणेनं परदेशात त्याची बॅट चालते हे पुन्हा दाखवून दिले. रहाणेनं आपल्या करिअरमध्ये तब्बल 6 शतक आणि 15 अर्धशतक भारताबाहेर लगावले आहे.

दरम्यान, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. चहापानापर्यंत भारताने 98 धावांत तीन गडी गमावले होते. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी शतकी भागिदारी केली. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरले. तर केएल राहुलसुद्धा लवकर बाद झाला. भारताची अवस्था 3 बाद 81 अशी झाली होती. विंडीजच्या रोस्टन चेजनं 42 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर रहाणे आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सांभाळला.

SPECIAL REPORT: चीनच्या मगरमिठीला हाँगकाँगचं आव्हान, स्वायत्त दर्जा धोक्यात

Published by: Suraj Yadav
First published: August 26, 2019, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading