IND vs WI : ‘मी संधी सोडत नाही’, हार्दिक पांड्याला युवा अष्टपैलू खेळाडूनं दिला इशारा

IND vs WI : ‘मी संधी सोडत नाही’, हार्दिक पांड्याला युवा अष्टपैलू खेळाडूनं दिला इशारा

हार्दिक पांड्याचे टीम इंडियातील स्थान धोक्यात?

  • Share this:

हैदराबाद, 05 डिसेंबर : बांगलादेशला टी-20 आणि कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजला नमवण्यासाठी सज्ज आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना उद्या हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर होत आहे. यातील टी-20 मालिकेत युवा खेळाडूंवर भर देण्यात आला आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत स्टार खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं हार्दिकच्या जागी सध्या संघात शिवम दुबे या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेट संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांना टीम इंडियामध्ये खेळण्याच्या संधींचा पुरेपूर घेण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेशविरूद्ध गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या शिवमने आपल्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे आहे हे स्पष्ट केले. तो हार्दिक पांड्याऐवजी अजिबात घेण्याचा विचार करत नाही.

वाचा-VIDEO : खतरनाक यॉर्कर! स्टम्प हवेत, फलंदाज जमिनीवर; तरी पंचांनी दिला NOT OUT

वेस्ट इंडीज विरुद्ध हैदराबाद येथे खेळल्या जाणार्‍या टी -20 मालिकेच्या पहिल्या सामन्याआधी दुबेनं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवम यानं, "मला वाटते की मला संधी मिळाली आहे आणि मी माझ्या देशासाठी मी जितके शक्य होईल तितके प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या देशासाठी मला एक भूमिका देण्यात आली आहे आणि ती चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी मिळालेली संधी सोडत नाही", असे सांगितले. हार्दिक पांड्या सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान हार्दिक आयपीएलआधी टीम इंडियात कमबॅक करू शकतो.

वाचा-'कॅच सुटल्यानंतर पंत चेंडू पकडण्यास देखील घाबरतो'

‘हार्दिकची जागा घेणार नाही’

हार्दिक पांड्या संघात नसल्यामुळं शिवम दुबेला त्याच्या जागी संधी मिळाली. मात्र हार्दिक पांड्याची जागा घेण्याबाबत शिवमला विचारले असता त्यानं, "हार्दिक पांड्याची जागा घेण्याची ही कोणतीही संधी मला वाटत नाही. प्रत्येक खेळाडूनं माझा आत्मविश्वास वाढवला आहे. संघ व्यवस्थापन असो किंवा कर्णधार सर्वांनी मला सांभाळून घेतले आहे. सगळ्यांनी मला खूप आत्मविश्वास दिला आहे. म्हणूनच मी खूप आनंदी आहे आणि ड्रेसिंग रूममध्ये खूप आरामदायक आहे", असे सांगितले. तसेच, आपल्या गोलंदाजीबाबत सांगताना, "अष्टपैलू खेळाडू होणे नेहमीच एक कठीण काम असते. माझ्यासाठी माझी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी तंदुरुस्ती कायम राखणे, कारण अष्टपैलू म्हणून तुम्हाला गोलंदाजी आणि फलंदाजी असेही म्हणावे लागेल. त्यामुळे तंदुरुस्ती राखणे खूप अवघड होते". असे मत व्यक्त केले.

वाचा-टी-20 मधील World Record; या संघाने 249 धावांनी मिळवला विजय!

’गोलंदाजीबाबत आत्मविश्वास कायम’

आपल्या गोलंदाजीबाबत बोलताना शिवम दुबेनं, ’मला माझ्या गोलंदाजीबद्दल खूप आत्मविश्वास आहे. टी -20 क्रिकेटमध्ये सर्व गोलंदाजांना चांगले आणि वाईट दोन्ही क्षण मिळतात. म्हणून मी चांगल्या परिस्थितीसाठी स्वत: ला तयार करेन आणि मला वाटते की मी चार षटके गोलंदाजी करणारा गोलंदाज होऊ शकेल. मी हे काम यापूर्वी केले आहे’, असे सांगितले.

असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा

6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई

8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम

11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद

वाचा-सिंगर धोनी तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर VIDEO VIRAL

T20I मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

वेस्ट इंडिजचा संघ- कॅरेन पोलार्ड (कर्णधार), फेब‍ियन एलेन, शेल्‍डन कोटरेल, श‍िमरॉन हेटमायर, जेसन होल्‍डर, ब्रेंडन क‍िंग, ईव‍िन लुईस, कीमो पॉल, न‍िकोलस पूरन, केरी प‍िएरे, द‍िनेश रामदीन, शेरफेन रुदरफोर्ड, लेंडल स‍िमंस, हेडल वॉल्‍श जून‍ियर आणि केसर‍िक व‍िल‍ियम्‍स.

Published by: Priyanka Gawde
First published: December 5, 2019, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading