VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? 4 चेंडूत रोहितनं सीमारेषेवर दाखवली कसरत

VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? 4 चेंडूत रोहितनं सीमारेषेवर दाखवली कसरत

रोहित शर्माच्या बाउंड्री लाईनवरच्या स्टंटचा VIDEO पाहिलात का?

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात अनेक नाट्यमय प्रकार घडले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं भारतासमोर 207 धावांचे डोंगर उभे केले. यात भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी विराटसाठी डोकेदुखी ठरणार आहे. गोलंदाज आणि फिल्डिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी सुमार कामगिरी केली. मात्र रोहित शर्मा मैदानावर कसरत दाखवताना दिसला.

रोहित शर्मानं भारताला स्लिपमध्ये निसटचा कॅच घेत दीपक चाहरच्या चेंडूवर पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर सीमारेषेवर असलेला रोहित शर्मा वेगवेगळ्या कसरती दाखवू लागला. शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये चेंडू रोहित जवळच येत होता. 16व्या ओव्हरमध्ये दोन कॅच रोहितनं सोडल्या, मात्र सीमारेषेवर त्यानं एक वेगळीच कसरत दाखवली. सुपरमॅन सारखा हवेत उडत रोहितनं चेंडू अडवला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-टीम इंडियाची लाजीरवाणी हॅट्रिक, युवराज सिंगनं युवा खेळाडूंना घेतले फैलावर

दीपक चहरच्या 17व्या ओव्हरमध्ये अनेक नाट्यमय प्रकार घडल्या. याआधी टीम इंडियानं एक-दोन कॅच सोडल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये भारताची लाजीरवाणी हॅट्रिक झाली. 17ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरनं हेटमायरचा कॅच सोडला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर रोहितनं सीमारेषेजवळ पोलार्डचा तर, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा रोहितनं पोलार्डचा कॅच सोडला. अखेर 18व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हेटमायर बाद झाला. रोहितच्या या कसरतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-गोलंदाजांचा सुपर फ्लॉप शो! भारताला 208 धावांचे आव्हान

वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी संपणार धवनचं करिअर? दिग्गज फलंदाजानं दिले संकेत

मात्र, 208 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवात करता आली नाही. रोहित शर्मा केवळ 8 धावा करत बाद झाला. त्यामुळं विराट कोहलीवर आता फलंदाजीची भिस्त असणार आहे.

पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या ओव्हरपासून विडींजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची शाळा घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चाहरनं सिमन्सला बाद केले. मात्र त्यानंतर विडींजनं आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. ईव‍िन लुईस आणि ब्रेंडन क‍िंग यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांच्या 62 धावांच्या भागिदारीच्या जोरावर चांगली धावसंख्या उभारून दिली. ईव‍िन लुईसनं 40 धावा केल्या. हेटमायरनं आपले अर्धशतकही पूर्ण केले, त्यानंतर 56 धावांवर चहलनं त्याला बाद केले. पोलार्डनं 19 चेंडूत 37 धावांची आतषबाजी खेळी केली.

Published by: Priyanka Gawde
First published: December 6, 2019, 9:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading