VIDEO : ‘…आणि टीम इंडियानं जिंकला सामना’, राहुलनं सांगितला विराटचा मास्टरप्लॅन

VIDEO : ‘…आणि टीम इंडियानं जिंकला सामना’, राहुलनं सांगितला विराटचा मास्टरप्लॅन

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा रुद्र अवतार पाहायला मिळाला.

  • Share this:

हैदराबाद, 07 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा रुद्र अवतार पाहायला मिळाला. विराटनं 50 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी करत टीम इंडियाला तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी मिळवून दिली. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करता आली. सलामीला आलेला रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि विराटनं भारताला विजयाच्या जवळ घेऊन गेले.

या सामन्यात सलामीवीर केएल राहुलने एक हजार टी -20 धावा पूर्ण करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दरम्यान सामन्यानंतर राहुल चहल टीव्हीच्या माध्यमातून विराट कोहलीचा मास्टरप्लॅन सर्वांना सांगितला. पहिल्या डावात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 208 धावांचे लक्ष्य दिले. पण विकेटविषयी बोलताना केएल राहुल चहल टीव्हीवर, “ही विकेट विचित्र होती. म्हणजे आम्ही बाद झालो होतो आणि आजपर्यंत मी खेळलेली सर्वात सपाट विकेट होती. परंतु दोन्ही संघांनी 200 धावा केल्या तरीही आम्ही विकेटबद्दल तक्रार करू शकत नाही. दुसर्‍या षटकातच मला 2-3- चौकार मिळाल्यामुळे मला थोडासा आत्मविश्वास आला. रोहितची विकेट गेली पण हे चांगले होते की विराट कोहलीने हा डाव शेवटपर्यंत नेला आणि संघाला विजय मिळवून दिला”, असे सांगितले.

वाचा-टीम इंडियाची लाजीरवाणी हॅट्रिक, युवराज सिंगनं युवा खेळाडूंना घेतले फैलावर

वाचा-विराटने त्याची डायरी भरमैदानात फाडली अन् तो बघतच राहिला, VIDEO VIRAL

भारतीय क्रिकेट संघ 208 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरला. हे लक्ष्य पाहून कोणत्याही संघाला घाम फुटेल, पण भारतीय फलंदाजांनीही वेळेचा पुरेपूर वापर करून हे लक्ष्य साध्य केले. जेव्हा चहलने इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या रणनीतीबद्दल विचारले तेव्हा राहुल म्हणाला की, “जेव्हा एवढ्या धावांचा डोंगर असतो तेव्हा कोणतीच योजना नसते. चेंडू दिसला की त्याला फटका मार एवढीच रणनीती होती”.

वाचा-VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? 4 चेंडूत रोहितनं सीमारेषेवर दाखवली कसरत

पहिल्या टी-20 सामन्यात गोलंदाजीमध्ये भारतीय संघानं काही चूका केला. ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका संघाला बसला, त्यामुळं वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 208 धावांचे लक्ष्य दिले. या विशाल ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाने चांगली कामगिरी बजावली. यात विराट कोहलीच्या 50 चेंडूंत 94 आणि केएल राहुलच्या 40 चेंडूंत 62 धावांची शानदार खेळी जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता मालिकेचा दुसरा टी-20 सामना रविवारी तिरुअनंतपुरम येथे रविवारी खेळला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या