IND vs WI : ICCचा नवा गेमचेंजर नियम, पहिल्या टी-20 सामन्यात होणार ट्रायल

IND vs WI : ICCचा नवा गेमचेंजर नियम, पहिल्या टी-20 सामन्यात होणार ट्रायल

आंतरराष्ट्रीय सामन्यांचा निकाल बदलवणारा नियमचं आता ICCनं बदलणार. उद्या होणार ट्रायल.

  • Share this:

हैदराबाद, 05 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 6 डिसेंबरपासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना हा हैदराबाद येथे होणार आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं या सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र या मालिकेत आयसीसीच्या वतीनं एक मोठा बदल करण्यात आळा आहे.

आयसीसीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाद कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात येत आहे. यात क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वाद हे नो बॉलवरून होतात. त्यामुळं या वादावर तोडगा म्हणून नियम आणला आहे. ऑस्ट्रेलिया-पाक यांच्यातील सामन्यात तब्बल 4 नो बॉलकडे पंचांनी दुर्लक्ष केले. त्यामुळं आता भारत-वेस्ट इंडिज मालिकेत मोठा बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाच्या चुकांना टाळण्यासाठी आता फ्रंट फूट नो-बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एका पंचाची मदत घेतली जाणार आहे.

वाचा-ऋषभ पंत की संजू सॅमसन कोणाला मिळणार संधी? विराटनं केलं जाहीर

बराच वेळा मैदानावरील पंचांकडून फ्रंट फूट नो-बॉल पाहताना चूक होते. त्यामुळं आता आयसीसीच्या वतीनं टीव्ही पंचांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसीच्या वतीनं सध्या टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळं 6 डिसेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत टीव्ही पंच असणार आहेत, अशी माहिती आयसीसीच्या वतीनं करण्यात आली आहे.

वाचा-VIDEO : पाठीला रुमाल बांधून का धावतायत टीम इंडियाचे खेळाडू? पाहा काय आहे प्रकरण

वाचा-‘मी संधी सोडत नाही’, हार्दिक पांड्याला युवा अष्टपैलू खेळाडूनं दिला इशारा

फ्रंट फूट नो-बॉल पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. त्यानंतर मैदानावरील पंच अंतिम निर्णय घेतील. हा नियम भारत-वेस्ट इंडिज मालिकेत लागू केला जाणार आहे. याआधी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात तिसऱ्या पंचांनी सराव म्हणून हॉकआय ऑपरेटरची मदत घेण्यात आली होती.

वाचा-VIDEO : खतरनाक यॉर्कर! स्टम्प हवेत, फलंदाज जमिनीवर; तरी पंचांनी दिला NOT OUT

आयसीसीनं जारी केलेल्या मजकुरात, “भारत-वेस्ट इंडिज यांच्यात फ्रंट फूट नो-बॉलचे काम तिसऱ्या पंचांकडून कसे होते, ते पाहिले जाईल. या पध्दतीचा सराव म्हणून याची मदत घेतली जाणार आहे. यासाठी तिसरे पंच मैदानावरीर मुख्य पंचांशी चर्चा करतील. मात्र मैदानावरील पंच याबाबत निर्णय देणार नाहीत. तो अधिकार फक्त तिसऱ्या पंचांकडे असणार आहे”, असे स्पष्ट केले आहे.

असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा

6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई

8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम

11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या